अभंग २९
सदगुरु सांवळा धरोनियां सोवळा ।
बापरखुमादेवविरु सदगुरु सांवळा ॥१॥
पाहिला म्यां डोळां पाहिला म्यां डोळा ।
घननीळा सांवळा पाहिला म्यां डोळां ॥२॥
चंद्रशेखराला आनंद मनाला ।
नये सांगायाला ज्याचा त्यासी ॥३॥
सदगुरु सांवळा धरोनियां सोवळा ।
बापरखुमादेवविरु सदगुरु सांवळा ॥१॥
पाहिला म्यां डोळां पाहिला म्यां डोळा ।
घननीळा सांवळा पाहिला म्यां डोळां ॥२॥
चंद्रशेखराला आनंद मनाला ।
नये सांगायाला ज्याचा त्यासी ॥३॥