अभंग १८
हरिवंशपुराण हेच हरिनाम कीर्तन
हरिवंशपुराण हरिनाम कीर्तन । हरिविण सौजन्य नेणें कांहीं ॥१॥
नामसंकीर्तन करणार्याला वैकुंठ जोडले
त्या नरा लाधलें वैकुंठ जोडलें । सकळ घडलें तीर्थाटन ॥२॥
मनोमार्गानें मेला तो मनाला मुकुन हरिपाठी स्थिर झालेला असा घन्य होतो
मनोमागें गेला तो तेथे मुकला । हरिपाठी स्थिरावला तोचि धन्य ॥३॥
सर्वकाळ रामकृष्णाचे ठिकाणीं असलेल्या आवडीची गोडी ज्ञानेश्वर महाराजांना असुन त्यांना हरिनामाची जोडी झाली.
ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी । रामकृष्णीं आवडीं सर्वकाळ ॥४॥