अभंग ३
त्रिगुण असार आणि निर्गुण सार हा सारासार विचार
त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरीपाठ ॥१॥
हरि वाचुन अगुण सगुण निर्गुणांत मन जाते
सगुण निर्गुणे गुणाचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥२॥
आत्मा अवय्क्त असुन चराचराकडुन प्रार्थिला जातो.
अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथोनी चराचर हरिसी भजे ॥३॥
मनांतील रामकृष्ण ज्ञानदेवांचे ध्यानीं असुन अनंत जन्मांचे हे पुण्य जोडले
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मोनि पुण्य होय ॥४॥