Get it on Google Play
Download on the App Store

सावध प्रकरण 17

 

प्रकरण १७

त्यानंतर पुढचा तासभर पाणिनी कनक ओजसच्या ऑफिसमध्ये सँडविच खात आणि कॉफी पीत बसला होता कनक च्या हातात सुद्धा कॉफीचा मग होता तेवढ्यात फोन वाजला कनक बऱ्याच वेळ फोनवर बोलत होता नंतर पाणिनी ला म्हणाला

" तुझा अंदाज बरोबर ठरला पाणिनी पत्रकारांनी त्या मोठ्या खोक्याचा तुझ्या गॅरेज पर्यंत पाठलाग केला. त्यांना तो खोका शेवटी रिकामाच आढळला. त्यांनी लगेच इन्स्पेक्टर तारकर ची भेट घेतली आणि त्याला ही सर्व हकीगत सांगितली आता तारकर प्रचंड वैतागलाय" कनक म्हणाला

पुन्हा एकदा कनक चा फोन वाजला कनकने तो कानाला लावला थोडा वेळ तो काहीतरी बोलला नंतर फोन ठेवून पाणिनी इकडे वळला

पाणिनी रुद्रांश गडकरी कुठेतरी निघून गेलाय. त्याचा काहीच तपास लागत नाहीये

पुन्हा एकदा फोन वाजला कनकने तो कानाला लावला पुन्हा थोडा वेळ फोन मध्ये काहीतरी बोलला

". पाणिनी त्याला हिराळकर ची गाडी सापडली ती पूर्ण मोडल्ये."

"हिराळकर चा काही पत्ता लागलाय?"

"नाही फक्त रिकामी गाडी सापडले त्याची"

"कुठे नेमकी?"

"चैत्रपूरपासून साधारण दहा किलोमीटर अंतरावर मुद्दामून कडेच्या भिंतीला घासून मोडण्यात आलेली"

"तुझ्या ज्या माणसाला ती सापडले त्याला सांग पोलीस ज्याप्रमाणे ती तपासतील त्याप्रमाणे तुम्ही तपासून घे त्यात नेमकं काय आहे आणि काय नाही ते मला हवय"

पाणिनी नाही दिलेली सूचना कनक ओजसने फोन मधून आपल्या गुप्तहेर ला दिली

"कार धडकण्यापूर्वी पॉलिस्टर काय फार लांब गेला नसावा मला वाटतं कनक ज्या रस्त्यावर ही कार धडकून बंद पडली तो रस्ता उदक प्रपात कडे तर जाणारा नसावा?"

"बरोबर आहे तुझा अंदाज तिकडेच जाणारा रस्ता आहे तो"कनक म्हणाला

पाणिनी विचारात गढून गेला.

"कसला विचार करतो आहेस एवढा?"

"रुद्रांश गडकरी चा"

"माझं अजूनही तेच मत आहे की तू तुझ्या ऑफिसमध्येच त्याला ओळखू द्यायला हवं होतं तारकर सांगत होता त्याप्रमाणे तू त्याच्यासमोर उभे राहून चालून दाखवायला हवं होतं आता जरी तो सापडत नसला तरी तो केव्हातरी येईलच आणि तुला ओळखलंच आणि त्या वेळेला तारकर्ली सिद्ध करील की तू पळून जायचा प्रयत्न केलास"

"उभे राहून दाखवायचं चालून दाखवायचं म्हणजे आपल्याकडे वधू परीक्षा करतात तसेच झालं असतं"पाणिनी म्हणाला

पाणिनी परत विचारात घडून गेला अचानक तो म्हणाला,

"माझ्या देहयष्टीशी साम्य असणारा तुझा एखादा हेर आहे का ज्याच्यावर तू भरोसा ठेवू शकतोस असा?"

"असा जर एखादा मला सापडला तर तो अडचणी देऊ शकेल?"

"मी सांगेन तसंच्या तसं त्यांनी ऐकलं तर नाही अडचणी येणार"

"जयराज राठोड नावाचा एक माणूस आहे माझा साधारण तुझ्याच देह यष्टीचा आणि एकदम भरोसेमंद आहे.

"कनक तू मला एकदा म्हणाला होतास जेव्हा एखादा माणूस एक मोठा कॅमेरा त्याच्याबरोबर फ्लॅश गन घेऊन एखाद्या ठिकाणी जातो तेव्हा तो वर्तमान पत्राचा फोटोग्राफर किंवा पत्रकार आहे असं सर्वांना वाटतं आणि मग त्याला फारसे प्रश्न कोणी विचारत नाही"

"हो बरोबर मी म्हणालो होतो "

"मला आता एक तसा फ्लॅश गन सहित कॅमेरा हवाय" पाणिनी म्हणाला

"आणि मला आणखीन पाच-सहा फोटोग्राफी करणारी माणसं किंवा फोटोग्राफी शिकणारे विद्यार्थी हवे आहेत मिळतील?" पाणिनी ने विचारलं.

"नक्की मिळतील" कनक म्हणाला

"आता त्या जयराज राठोडला ताबडतोब बोलावून घे आणि सौम्याने माझा जो कोट तुझ्या कपाटात आणून ठेवला आहे तो आपल्याला लागणार आहे माझ्या डोक्यात जो विषय चालला आहे तो आपल्याला पटकन संपवायला हवा त्यामुळे जयराज राठोडला ताबडतोब इकडे यायला सांग"

नाईलाजाने का होईना पण कनक ने फोन लावला फोन लागेपर्यंत त्यानं पाणिनी ला विचारलं

"तुझ्या डोक्यात नेमकं काय चाललंय?"

"तुला खरच ते जाणून घ्यायचं आणि स्वतःला अडचणीत आणायचय?" पाणिनी ने विचारलं.

" बिलकुल नाही मला जेवढं कमी माहिती आहे तेवढा मी अधिक सुरक्षित राहीन" कनक म्हणाला

थोड्याच वेळात जयराज राठोडकनकच्या ऑफिसात हजर झाला कनक न पाणिनी आणि त्याची ओळख करून दिली.

"मी ओळखतो तुम्हाला तुमच्याबद्दल मी बरंच वाचलं आणि ऐकलं ही आहे" जयराज राठोडम्हणाला

"मला नेमकं काय करायचंय मिस्टर पटवर्धन?"

" सगळ्यात पहिल्यांदा माझा हा कोट तुला होतोय का बघ."

जयराज राठोडने पाणिनी पटवर्धनचा कोट अंगात घातला अगदी स्वतःचाच कोट असल्यासारखा त्याला तो फिट बसला.

" आपल्याला आता एका बंगले वजा रिसोर्ट ला जायचंय. तिथे, कनक तुझे फोटोग्राफी करणारे विद्यार्थी आता बोलून घे त्यांच्याबरोबर कॅमेरे आणि फ्लॅश गन असू देत पुढच्या अर्ध्या तासात मला ते हवे आहेत. चल निघूया आपण जयराज " पाणिनी म्हणाला आणि त्याने आपल्या खांद्यावर कॅमेराची आणि फ्लॅश गन ची बॅग अडकवली आणि जयराज राठोडला घेऊन बाहेर पडला.

लिफ्ट मध्ये चढताना लिफ्ट मन पाणिनी ला बघून एकदम हादरलाच.

" अरे तुम्ही इथे आहात मला वाटलं की तुम्ही इथून निसटून जाणं अपेक्षित..."

" वेड लागले की काय तुला मी रात्री उशिरापर्यंत काम करत होतो" पाणिनी म्हणाला

"अहो पण तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये नव्हतात "

"बरोबर आहे मी कनक ओजस बरोबर मीटिंगमध्ये होतो"

"अरे बापरे त्या पत्रकारांना तर वाटत होतं की ट्रक मध्ये टाकलेल्या मोठ्या खोक्यात तुम्ही बसला आहात आणि...."

" त्यांना काय वाटलं असावं त्यात तुझी काही चूक नाहीये त्यांच्या चुकीचा त्यांनाच पश्चाताप होऊ दे. तू शांत रहा" पाणिनी म्हणाला आणि आपल्या पाकिटातून एक 100 ची नोट काढून त्याने लिफ्ट मन च्या खिशात सरकवली. ते दोघे बाहेर पडले आणि जयराज राठोडच्या गाडीत बसले

"हायवेला गाडी घे. आणि एखादं रिसॉर्ट सारखं दिसणार हॉटेल दिसलो की गाडी थांबव" पाणिनी म्हणाला 

तो गाडी चालवत राहिला पाणिनी पटवर्धनच्या मनात होतं तसं एक बंगले वजा रिसॉर्ट त्यांना सापडलं.

पाणिनी ने त्याला आत जाऊन बुकिंग करायला सांगितलं.बुकिंग झाल्यावर तो जयराज ला म्हणाला, “कनक ला फोन लाव आणि इथला पत्ता सांग.त्याला म्हणावं इथे तुझे फोटोग्राफर्स पाठव.त्या नंतर दहा मिनिटांनी पोलीस स्टेशन ला फोन लाऊन इन्स्पेक्टर होळकर ला फोनवर घे.त्याला सांग की तू जनसत्ता या पेपरचा वार्ताहर आहेस आणि माझं नाव न सांगण्याच्या अटीवर आणि मला संरक्षण देण्याच्या अटीवर एक गुप्त बातमी द्यायची आहे,की तुझ्या वार्ताहारांनी पाणिनी पटवर्धन चा ठाव ठिकाणा शोधून काढलाय. त्याला इथला पत्ता सांग.त्याला हे ही सांग की पाणिनी अत्ता कनक ओजस च्या जयराज नावाच्या एका माणसा सोबत इथे आहे.त्याच्या गाडीचा नंबर अमुक अमुक आहे.त्याला सांग की रुद्रांश गडकरी ला घेऊन ताबडतोब इथे ये.त्याला म्हणावं तुझ्या जनसत्ता ने ही बातमी प्रथम तुला दिली याचं क्रेडीट मिळायला हवं.” पाणिनी म्हणाला

“ करतो बरोबर. आणखी काय?” जयराज ने विचारलं.

“ हे सगळं झाल्यावर जनसत्ता ला फोन करायचा.त्यांना सांगायचं की पाणिनी पटवर्धन चा ठाव ठिकाण लागलाय आणि इन्स्पे.होळकर रुद्रांश गडकरी ला घेऊन पाणिनी पटवर्धन ची ओळख पटवायला इथे येतोय.” पाणिनी म्हणाला

“ हा होळकर तुम्हाला ओळखतो?” जयराज ने विचारलं.

“ दोघेही एकमेकांना पुरते ओळखून आहोत.”

“ त्यामुळे तुमचा जो काही प्लान डोक्यात आहे तो फुकट नाही जाणार?” जयराज ने विचारलं.

“ नाही.कारण होळकर इथे येईल तेव्हा त्याला काहीच दिसणार नाही.” पाणिनी म्हणाला

“ म्हणजे?”

“ डोळ्यासमोर लागोपाठ दहा बारा फ्लॅश बल्ब्ज चा उजेड पडल्यावर कधी अंधारात बघायचा प्रयत्न केलायस?” पाणिनी ने विचारलं.

जयराज हसला. “ माझी ट्यूब पेटली पटवर्धन! मी कामाला लागतो.”

कनक ओजस चा कोट पाणिनी च्या अंगावर होता. कनक ने पाठवलेले फोटोग्राफर्स आले होते.त्यांना पाणिनी सविस्तर सूचना देत होता.तेवढ्यात सायरनचा कर्ण कर्कश्य आवाज करत

होळकर ची गाडी आली.

“ आले पोलीस. सांगितलेलं लक्षात ठेवा.” पाणिनी म्हणाला

होळकर खाली उतरला आणि कनक ने पाठवलेले भाडोत्री फोटोग्राफर्स होळकर भोवती जमले.त्यांनी कॅमेराचे फ्लॅश बल्ब उडवत होळकरचे फोटो घ्यायला सुरुवात केली.होळकरचे डोळे दिपून गेले.

“ ए ! काय चावटपणा आहे हा?” होळकर ओरडला पण मनातून प्रसिद्धी मिळत असल्याने खुष झाला होता.

“ आम्ही जनसत्ताचे पत्रकार आहोत तारकर साहेब.पेपरात देण्यासाठी फोटो घेतोय. ” त्यातला एक जण म्हणाला.

“ माझं आडनाव तारकर नाही.होळकर आहे. चूक करू नका तुम्ही पेपरात बातमी देताना.हो-ळ-क-र लक्षात राहील?”

“ हो.हो. समजलं.काळजी नका करू.”

“ पाणिनी पटवर्धन खरंच आलाय इथे?” होळकर ने विचारलं.

“ खात्रीने.आम्ही रजिस्टर बघितलं. त्याच्या बरोबर कनक ओजस च्या गुप्तहेर संस्थेचा माणूस आहे.”

परत एकदा फ्लॅश बल्ब चमकले. ती संधी साधून पाणिनी हळूचकन.भिंतीजवळून सरकत पोलिसांच्या गाडीच्या बाजूला सटकला. “हा पहा येतोय पाणिनी पटवर्धन.” एक पत्रकार ओरडला.

होळकर खुष झाला, रुद्रांश गडकरी कडे बघून उद्गारला, “ पाणिनी पटवर्धन येतोय पहा.”

खोलीच्या बाहेर, कोट घातलेली एक आकृती पळत येताना दिसली. ती थेट पोलिसांच्या गाडीच्या दिशेनेच जाताना दिसली. पुन्हा एकदा फ्लॅश बल्ब चमकले.त्या बरोबर ती आकृती थांबली.आणि वळून पुन्हा एकदा आपल्या खोलीकडे जायला निघाली. पुन्हा एकदा फ्लॅश बल्ब चमकले.होळकर रुद्रांश गडकरी कडे वळला आणि म्हणाला, “ बघितलस ना नीट त्याला? तोच आहे ना?”

उत्तर आलं नाही.

“ काय म्हणतोय मी?” होळकर म्हणाला.

“ तोच आहे तो.” रुद्रांश गडकरी म्हणाला.

होळकर आणि तो पुन्हा गाडीत बसले.जातांना त्याने त्या सगळ्या पत्रकारांना हात हलवून टाटा केला. “फोटो नीट येतील असं बघा.आणि आडनाव लक्षात ठेवा, होळकर असं आहे.” इन्स्पे.होळकर जीप चालू करतांना म्हणाला आणि निघून गेला.

होळकर गेल्यावर कनक ने आणलेल्या पत्रकारांना पाणिनी म्हणाला, “ सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी काढलेले फोटो प्रिंट काढून ठेवा.”

“ माझं काम कसं झालं पटवर्धन?” जयराज म्हणाला.

“ छानच! चला आता कोटाची अडला बदल करुया. जनसत्ता चे खरे पत्रकार येतीलच आता केव्हाही.” पाणिनी म्हणाला

त्यांचं बोलणं संपतंय तोवर पुन्हा एक गाडी आली.त्यातून एक माणूस उतरला.

“ आम्हाला पाणिनी पटवर्धन यांची मुलाखत घ्यायची आहे. आम्ही जनसत्ता मधून आलोय.” तो माणूस म्हणाला.

“ कशाबद्दल बोलताय तुम्ही?” जयराज आश्चर्य दाखवत म्हणाला.

“ येऊ दे त्यांना आत. नाहीतरी त्यांनी मला इथे शोधून काढलंच आहे.तर घेउदे त्यांना माझी मुलाखत.” पाणिनी म्हणाला

“ नमस्कार अॅडव्होकेट पटवर्धन. पोलिसांना तुम्ही अगदी इथपर्यंत पाठलाग करायला लावलात.”तो पत्रकार म्हणाला.

“ मी एका प्रकरणात काम करतोय.त्यासाठी खूप एकाग्रतेची गरजआहे म्हणून मी इथे आलोय.पोलिसांना गुंगारा द्यायला नाही.” पाणिनी म्हणाला एका फोटोग्राफर ने फोटो घेतला.

“ इन्स्पे.होळकर इथे साक्षीदाराला, रुद्रांश गडकरी ला घेऊन आला होता.पण ते लोक दहा मिनिटं सुध्दा इथे नव्हते. ” पाणिनी म्हणाला

“पटवर्धन, आम्हाला तुमचे फोटो हवेत.जरा दारात उभे राहता का?”

पाणिनी ने त्यांची इच्छा पूर्ण केली.

“ मला या प्रकरणाबद्दल माहिती हवी आहे.”

“ सॉरी, मला काहीच बोलायचं नाहीये.” पाणिनी म्हणाला

“ एवढंच सांगा, इन्स्पे.होळकर इथे आले होते?”

“ बरोबर आहे.तुम्ही त्यांनाच विचारा ना सगळं !” पाणिनी म्हणाला

( प्रकरण १७ समाप्त.)