गळका माठ...
कुठे लपला चंद्र उलटून गेली रात
नदीही धावते सोडून माघे काठ....
कोठे उडाले पक्षी घरटे सोडून आत
भटकून दिशा दाही गेली हरवून वाट..
रोज तुटतात अगनिक तारे
तुटत्यास नेहमी मोकळीच वाट.....
देवळात बसले देव निराळे
चिपकूनी भोवती दांभिक माठ...
कुणास म्हणावे माणूस हल्ली
रुबाब त्याचा भलताच ताठ....
स्मशानात शेवटी विझतो माणूस
फुटतो जेव्हा गळका माठ....
संजय सावळे....