खरचं देव असतो का....
अरे आपण म्हणतो देव
सारं काही पाहत आहे,
तो तरी काय बघणार
तोही थोडा कॅन्फुज आहे ...
आत्मा म्हणतो अमर आहे
देह मात्र जळतो आहे,
पाप पुण्य मोजणारा
मुक्त येथे वावरतो आहे....
देवाच्याच नावा माघे
नंगा नाच चालतो आहे,
जो तो म्हणतो मीच फक्त
बाकी सारे चांडाळ आहे.....
देव कुठं काय मागतो
मागणारे सारे भक्त आहे,
पोटं भरून देई ढेकर
विधाता मात्र लाचार आहे ....
संजय सावळे...