Get it on Google Play
Download on the App Store

होल्ड अप प्रकरण दोन

होल्ड अप
प्रकरण २
“ तुम्ही आरोपीला खूप कमी कालावधी पाहिलंत?” आपल्या आवाजात सहजपणा आणत पाणिनी ने विचारलं.
“ कमी कालावधी कशाला म्हणायचं हे व्यक्ती नुसार बदलतं पटवर्धन. ” ती उर्मट पणे म्हणाली.
“ म्हणजे कदाचित एक मिनिटा पेक्षा कमी?”  पाणिनी ने विचारलं.
“ कदाचित.” मरुशिका म्हणाली
“ अर्ध्या मिनिटापेक्षा ही कमी? ”
“ असेल.कदाचित.”-मरुशिका
“ तुम्ही सिया माथूर बरोबर गाडीने व्हिला नंबर दोन मधे आलात.?”
“ हो.”
“ किती अंतर होतं ? होल्ड अप झाल्याच्या ठिकाण पासून ते व्हिला नंबर दोन ?”
 पाणिनी ने विचारलं.
“ अर्धा किमी पण नसेल.”-मरुशिका
“ किती वेळ लागला जायला?”- पाणिनी ने विचारलं.
“ काही मिनिटंच लागली.”-मरुशिका
“ होल्ड अप चं नाट्य घडायला जेवढा वेळ लागला, त्याच्या चौपट वेळ व्हिला वर जायला लागला?”  पाणिनी ने विचारलं.
“ शक्य आहे.”
“ पाच पट जास्त?”
“ कदाचित”-मरुशिका
“ सहा पट ?”  पाणिनी ने विचारलं.
“ मला खरंच माहीत नाही पटवर्धन.”
“ तुम्हाला या कोर्टाची अशी समजूत करून द्यायची आहे का, की एकदाच कटाक्ष टाकून होल्ड अप करणारी व्यक्ती म्हणजे आरोपी आहे असे तुम्ही ओळखलत पण जिच्या बरोबर तुम्ही गाडीतून होल्ड अप च्या ठिकाणाहून व्हिला वर गेलात ती सिया माथूर चं होती याची तुम्हाला खात्री नाही?”  पाणिनी ने विचारलं.
अचानक तिच्या डोळ्यात विजयाची चमक पाणिनी ला दिसली.
“ मी असं म्हणाले होते मिस्टर पटवर्धन की ती सिया माथूर होती याची मला खात्री होती.”
 पाणिनी ने कोर्टाच्या दारात पाहिलं .तिथे कनक ओजस एकटाच उभा होता.त्याने पाणिनी कडे बघून हळूच नकारार्थी मान हलवली.
“ कनक, सिया ला कोर्टात हजर करायला माझी हरकत नाही. जर मरुशिका यांची खात्री असेल तर मी त्यांचा शब्द मानायला तयार आहे.”
“ धन्यवाद.” गोड पणे हस्त मरुशिका म्हणाली.पण तिच्या चेहेऱ्यावर आपण पाणिनी पटवर्धन ला कसे पुरून उरलो असे भाव होते.
पाणिनी ने पटकन घड्याळाकडे पाहिले. मागची तेरा मिनिटे तो झगडत होता पण मरुशिका जे काही म्हणत्ये ते खोटं आहे हे त्याला सिध्द करता आलं नव्हतं.त्यात आणखी वाईट हे होतं की आपण पाणिनी ला पुरून उरलोय हे तिला समजलं होतं त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता.उरलेली वेळ, म्हणजे कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत स्वतःला अधिक अपमानित करून घेणं हे त्याला परवडणारं नव्हतं.
“ तुम्ही आरोपीला नंतर पुन्हा पाहिलंत?”
“ होय मिस्टर पटवर्धन.”
“ कधी,नेमकं?”
“ पोलीस चौकीत. ओळख परेड मधे.” मरुशिका म्हणाली.
“ आणि आरोपीला तुम्ही त्या रांगेतल्या  अनेक माणसांमधून बरोबर ओळखलंत? ”
“ नि:संदेह्पणे.”-मरुशिका म्हणाली.
“ आणि तुम्ही होल्ड अप च्या तारखे पासून पोलीस चौकीत ओळख परेड होई पर्यंतच्या कालावधीत आरोपीला बिलकुल पाहिलं नव्हतं याची खात्री आहे? ”
“ शंभर टक्के.”
“तुमच्या बरोबर ओळख परेड मधे कोण होतं? ”  पाणिनी ने विचारलं.
“ मिस्टर कामोद.”
“ तुम्ही तिथे एकत्रच होतात?”  पाणिनी ने विचारलं.
“ अर्थातच, स्वाभाविक पणे.”
“ तुम्ही स्वाभाविक पणे.”असा शब्द प्रयोग का वापरलात?”  पाणिनी ने विचारलं.
“ कारण होल्ड अप मधे आम्ही एकत्र ओलीस ठेवले गेलो होतो आणि स्वाभाविकच आम्ही असं गृहित धरलं होत की पोलिसांना ही असंच हवं असेल की आम्ही एकत्रच त्याला ओळखावं.”—मरुशिका
“ मग तुम्ही आरोपीला एकत्र ओळखण्या ऐवजी एका वेळी एक अशा पद्धतीने का ओळखलं नाहीत? त्यामुळे ओळख अधिक खात्रीपूर्वक पटवता आली असती. ”
“ ते मला विचारण्या ऐवजी पोलिसांना विचारा.” मरुशिका ने फटकारलं.
“ तुम्ही एकत्रच ओळखावं आरोपीला या बद्दल पोलिसांनी काही कारण सांगितलं का?”
“हो”
“ काय कारण सांगितलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ ते ऐकीव होईल.” न्यायाधीश म्हणाले.
“ सांगू दे, सांगू दे. आमची काही हरकत नाही.” सरकारी वकील आरुष काणेकर हसून म्हणाला.
“ तुम्ही रेकॉर्ड वर चुकीचं आणायचा पायंडा पडू नका.ऐकीव पुरावा हे कोर्ट मान्य नाही करणार. आणि त्याच बरोबर उगाच वेळकाढू पणाचं धोरण सुध्दा अवलंबून देणार नाही. पटवर्धन, तुम्ही चालू करा.” न्यायाधीश म्हणाले.
“ तुमच्या पैकी कोणी आधी ओळखलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ आम्ही एकाच वेळी ओळखलं.” मरुशिका
“ त्याला रांगेत पाहिल्या पाहिल्या लगेचच तुम्ही ओळखलं?”
“ नक्कीच,खात्रीलायक पणे ओळखलं, मिस्टर पटवर्धन. ”—मरुशिका
“ आणि कामोद यांनी सुध्दा तुमच्या बरोबरीने तसच केलं?”
“ होय.”
“ ओळख पटवताना नेमकं काय केलंत?”
“ त्याच्या दिशेने बोट करून दाखवलं.”
“ मिस्टर कामोद यांनी काय केलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ बोट दाखवलं.”
“ तुम्ही दोघांनी एकाच वेळी बोट दाखवलं?”
“ दोघांनी एकाच वेळी,मिस्टर पटवर्धन. अगदी सेकंदाचा सुध्दा फरक नाही पडला.”-मरुशिका
“ होल्ड अप झालेल्या दिवसा नंतर ओळख परेड च्या दिवसा पर्यंत तुम्ही त्याला पाहिलं नव्हतं?”
“ नव्हतं. हे मगाशी विचारलं होतं तुम्ही.”-मरुशिका
न्यायाधीशांनी हातोडा आपटला. “ फक्त उत्तर द्या पटवर्धन ना त्यांनी आधी काय केलं काय नाही हे सांगू नका.”
“ नाही पाहिलं.”-मरुशिका
“ तुम्ही फोटो पहिला होता आरोपीचा?”
मरुशिका जरा अस्वस्थ झाली.
“ उत्तर द्या.” पाणिनी कडाडला.
“ हो..म्हणजे...”
“ किती दिवस आधी? म्हणजे ओळख परेड च्या किती दिवस आधी?”
“ एक दिवस.”-मरुशिका
“ अरे वा ! आणि कोणी दाखवला तुम्हाला फोटो?”  पाणिनी ने विचारलं.
“ मिस्टर कामोद यांनी.”
“ त्या वेळी कामोद बरोबर कोण होतं?”
“ पोलीस अधिकारी.”
“ म्हणजे ज्यावेळी तुम्ही रांगेतून आरोपीला ओळखलं, त्या आधी तुम्ही फोटोचा अभ्यास केला होता?”
“ मी असं म्हणेन की मी फोटो पहिला होता.”-मरुशिका
“ जेव्हा तुम्ही फोटो पाहिलात तेव्हाच्या परिस्थितीचे वर्णन करा.”
“ मी व्हिला नंबर तीन मधे होते. साध्या वेषातल्या पोलीस अधिकाऱ्या बरोबर कामोद तिथे आला आणि मला म्हणाला, मरुशिका,या लोकांनी आपल्याला लुटणारा माणूस पकडलाय.माझं पाकीट आणि तुझी पर्स त्यांनी मिळवली आहे. त्यांना पैसे नाही मिळाले त्यात, माझी टाय पिन पण नाही त्यात.”
“ पोलीस अधिकाऱ्याने काही सांगितलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ तो म्हणाला की आम्हाला जो पर्यंत आम्ही पकडलेल्या माणसा बद्दल खात्री वाटत नाही तो पर्यंत तुम्ही उगाचच ओळख परेड मधे यायचा त्रास घेऊ नका.”-मरुशिका
“ आणि मग त्याने तुम्हाला आरोपीचा फोटो दाखवला?”
“ हो.”
“ आणि तो फोटो पोलिसांनी काढलेला फोटो होता?”- पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ म्हणजे तुम्ही तो फोटो बघण्यापूर्वी मिस्टर कामोद ने बघितला होता?”
“ अर्थात. म्हणजे तसंच असणार.”-मरुशिका
“ आणि तुम्ही फोटो ओळखला?”
“ मला म्हणायचं होत की तो फोटो अगदी होल्ड अप करणाऱ्या माणसा सारखाच होता.”-मरुशिका
“ आणि तो तुम्ही ओळखल्यावरच तुम्हाला पोलीस चौकीत ओळख परेड साठी येण्याची व्यवस्था केली गेली?”
“ हो.”
“ तुम्ही फोटो पाहिलात तेव्हा तुम्हाला खात्री होती त्याच माणसाचा फोटो असल्याची?”  पाणिनी ने विचारलं.
“ चांगलीच खात्री होती.”
“ आणि मिस्टर कामोद?”
“ त्यांची पण.”
“ तुम्हाला काय माहीत ते?”  पाणिनी ने विचारलं.
“ त्याने मला सांगितलं तसं ”
“ फोटो पण त्यानेच दाखवला होता?”
“ हो” मरुशिका म्हणाली
“ आणि तो तुम्हाला दाखवताना कामोद यांनी असं सांगितलं की मरुशिका, हा तो माणूस आहे ज्याने होल्ड अप केला, किंवा या आशयाचे शब्द?”-- पाणिनी ने विचारलं.
“ तो म्हणाला की त्या माणसाला त्याने ओळखलंय, होल्ड अप करणारा माणूस म्हणून, त्याने मला असं सुचवलं की मी पण एक नजर टाकावी त्याकडे आणि तो , तोच माणूस असल्याची खात्री करावी.” –मरुशिका
“ म्हणजेच ओळख परेड ला जाण्यापूर्वी, तुम्ही त्या फोटोचा चांगला अभ्यास करून आरोपीच्या शारीरिक वैशिष्ठ्यांशी आणि  चेहेऱ्याशी चांगल्याच परिचित झाला होतात ?”
“ मी तशा पद्धतीने मांडणी करणार नाही प्रश्नांची, मिस्टर पटवर्धन.” मरुशिका म्हणाली.
“ मी तशी केल्ये मांडणी. तुम्ही फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.”- पाणिनी म्हणाला.
“ मी फोटो पहिला होता.”
“ त्याचा अभ्यास ही केला होता?”  पाणिनी ने विचारलं.
“ अभ्यास वगैरे नव्हता केला.”-मरुशिका
“ म्हणजे न अभ्यासताच तुम्ही ओळख पटवली?”
“ नाही... मी अभ्यास केला होता.”-मरुशिका
“ आणि, अभ्यास करून आरोपीच्या शारीरिक वैशिष्ठ्यांशी आणि  चेहेऱ्याशी  परिचित झाला होतात ? ”- पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ म्हणजे पोलीस चौकीत जाण्या पूर्वीच तुम्ही आरोपीची ओळख पटवली होती?”  पाणिनी ने विचारलं.
“ नाही.”
“ पण तुम्ही  त्याचा फोटो ओळखलात?”
“ पण  फोटो ओळखला म्हणजे आरोपी नव्हे. ”- मरुशिका
“ पण तुम्ही ओळख पटवली?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ खात्रीशीर ओळख?”
“ हो.”
“ आणि तुम्ही तसं पोलिसांना सांगितलं?”  पाणिनी ने विचारलं.
“ हो.”
“ जर फोटोग्राफ बघूनच तुम्हाला खात्री झाली होती, की तोच होल्ड अप करणारा माणूस आहे, तर तुम्ही पुन्हा दुसऱ्या दिवशी ओळख परेड साठी चौकीत कशाला गेलात?”  पाणिनी ने विचारलं.
“ कारण ... मला वाटतं की पुरावा म्हणून तिथे जाऊन ओळखणं आवश्यक आहे असं त्यांचे कडून सुचवलं गेलं.”
“ याचाच अर्थ, कोर्टात देण्यायोग्य  पुरावा निर्माण करण्यासाठी, तुम्ही चौकीत गेलात?”- पाणिनी ने विचारलं.
“ युअर ऑनर, मी पुरावा निर्माण करणे या शब्दाला हरकत घेतो.” सरकारी वकील आरुष काणेकर उठून उभा रहात म्हणाला.
“ मान्य.” न्यायाधीश म्हणाले.
“ पुरावा पुरवण्यासाठी तुम्ही चौकीत गेला होतात?”  पाणिनी ने विचारलं.
“ ओळख परेड चा तोच एकमेव  हेतू नसतो का मिस्टर पटवर्धन?”
“ प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, उत्तरादाखल तुम्ही मला प्रति प्रश्न नका विचारू.” पाणिनी कडाडला.
( प्रकरण २ समाप्त.)