मंदिर निर्माणानंतर
१९०० च्या दशकाच्या सुरुवातीला काशी विश्वनाथ मंदिराला तीर्थयात्रेच्या मार्गांचा मध्यवर्ती घटक म्हणून प्रस्थापित करण्यात अखेर यश आले.या १०० वर्षांमध्ये, ज्ञान वापीच्या मुद्द्यावरून हिंदू आणि मुस्लिम यांच्यात वाद धुमसत राहिले. दोन्ही पक्षांकडून या वास्तूसाठी समान आर्थिक गुंतवणूक केली गेली.१८२८ मध्ये, मराठा शासक दौलतराव सिंधिया यांच्या विधवा पत्नी श्रीमती. बायजाबाई यांनी ज्ञान वापी विहिरीवर छताला आधार देण्यासाठी एक मंडप बांधला.
एम. ए. शेरिंग, १८६८ मध्ये लिहितो, ‘हिंदूंनी मुस्लिमांना अनिच्छेने मशीद ठेवण्याची परवानगी दिली होती. त्यांनी चौथरा तसेच दक्षिणेकडील भिंतीवर हक्क सांगितला होता आणि मुस्लिमांना बाजूचे प्रवेशद्वार वापरण्यास भाग पाडले होते. मुस्लिमांनी मशिदीसमोरील प्लॅटफॉर्मच्या मधोमध एक प्रवेशद्वार बांधले होते, परंतु त्यांना त्या प्रवेशद्वाराचा वापर करण्याची परवानगी नव्हती. हिंदूंनी प्रवेशद्वारावर वाढलेल्या पिंपळाच्या झाडाची पूजा केली आणि मुस्लिमांना त्याचे साधेएक पानही तोडू दिले नाही. १९०९ मध्ये एडविन ग्रीव्हज यांना आढळून आले की ती मशीद वापरली जात नव्हती परंतु हिंदूंसाठी नेहमीच नकोशी वस्तू होती.