Get it on Google Play
Download on the App Store

पुनर्बांधणीचे प्रयत्न

१६९८  मध्ये, अंबरचा शासक बिशन सिंग याने शहराची पाहणी केली तसेच मंदिराच्या विध्वंसाबद्दल विविध दावे आणि विवादांचे तपशील गोळा केले. तराह वर म्हणजेच नकाशांवर ज्ञान वापी येथील उध्वस्त झालेल्या विश्वेश्वर मंदिराचे अवशेष जागेवर पडलेले असल्याचे चिन्हांकित केले आहे आणि मंदिराचा ढाचा देखील नकाशावर चिन्हांकित केला आहे.

मशीद न पाडता मंदिराची पुनर्बांधणी करण्याच्या उद्देशाने राजा बिशन सिंगच्या दरबाराने ज्ञानवापी परिसराच्या आसपासचा बराच भाग विकत घेतला, ज्यात काही मुस्लिम रहिवाशांच्या जमिनींचा देखील समावेश होता, परंतु प्रयत्न अयशस्वी झाले.

त्याऐवजी इस १७०० च्या आसपास, मशिदीपासून १५० यार्डांवर, सिंग यांचे उत्तराधिकारी सवाई जयसिंग द्वितीय  यांच्या पुढाकाराने एक आदि-विश्वेश्वर मंदिर बांधले गेले. बांधकाम समकालीन शाही वास्तुकलेवर मोठ्या प्रमाणात आधारित आहे. ज्यावरून या बांधकामाला शाही समर्थनाचा पुरावा असल्याचे स्पष्ट होते असे देसाई आणि आशेर म्हणतात.

१८ व्या शतकाच्या सुरूवातीस हा प्रदेश लखनौच्या नवाबांच्या प्रभावी नियंत्रणात होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनाने आणि वाढत्या तीव्र विलयीकरणाच्या धोरणांमुळे, देशभरातील अनेक राज्यकर्ते आणि अगदी प्रशासकीय उच्चभ्रूंनी त्यांच्या जन्मभूमीवर सांस्कृतिक अधिकाराचा दावा करण्यासाठी बनारसच्या घाटांचे आसपास हिंदूंच्या प्रभावाला पाठींबा देण्यास सुरुवात केली.

याकाळात सर्वच हिंदू शासक आणि विशेषतः मराठे, औरंगजेबाने केलेल्या धार्मिक अत्याचार आणि मंदिरांचा विध्वंस याबाबत अत्यंत आक्रमकरीत्या आवाज उठवत होते. नाना फडणवीस यांनी मशीद पाडून विश्वेश्वर मंदिराची पुनर्बांधणी करण्याचा प्रस्ताव मांडला. १७४२ मध्ये मल्हारराव होळकर यांनी अशाच प्रकारची कृती प्रस्तावित केली

त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतरही, लखनौचे नवाब जे त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते, मुघल दरबाराच्या क्रोधाची भीती बाळगणारे स्थानिक हिंदू आणि जातीय तणावाचा उद्रेक होण्याची भीती असलेले ब्रिटीश अधिकारी यांच्या अनेक हस्तक्षेपांमुळे या योजना कधीच प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत.