Get it on Google Play
Download on the App Store

भाग ३

सावंत परत घरी परतले. बायको त्यांना पाहून आश्चर्यचकित झाली. "काय झाले तुम्ही गेला नाहीत? अचानक असे परत....."

सावंत थकले होते. "रात्रभर मला झोप नाही. मला झोपू दे. मग सांगेन तुला."

दुपारी केव्हातरी सावंतांच्या ऑफिसमधून फोन आला."

"वहिनी, मी साने बोलतोय ऑफिसमधून."

"मी मिसेस सावंत. बोला साने साहेब, फारा दिवसांनी फोन केला."

"वहिनी, देवाच्या इच्छे समोर आपण पामर काय करणार. ईश्वरेच्छा बलीयसि."

"हो खरच आहे, काय झालं  काय? ऑफिसमध्ये काही ....."

"हो नाही म्हणजे जवळपास तसच. कस सांगू मी तुम्हाला. सावंतांच्या फ़्लाईटला अपघात झाला आहे."

"अरेरे, म्हणजे सगळेच गेले असतील नाही का. थांबा लाईन वर. मी मिस्टर सावंतांना बोलावते हं"

"ऑं....."

*****

यथावकाश निशुने मिसेस आणि मिस्टर सावंतांच्या आयुष्यात प्रवेश केला. एक वर्ष कसे भुर्कन उडून गेले ते समजलेच नाही. निशीचा पहिला वाढदिवस सावंतांनी  धुमधडाक्यात साजरा केला. त्या दिवशी कुरियरने एक बॉक्स आली. त्यात निशीसाठी कुणा अज्ञात व्यक्तीने रोबोप्लेन-एअरबस- २३० भेट म्हणून पाठवलं होतं.

एकूण राजेश कैवारीचं आमच्यावर लक्ष होते तर!!!

तू माझा कैवारी

अतुल प्रभुदेसाई
Chapters
भाग १ भाग २ भाग ३