Get it on Google Play
Download on the App Store

राज्याभिषेक

संध्याकाळची वेळ होती. सूर्य अस्तास जात होता. अशा सुमारास सर्पकेतूचा पाठलाग करणाऱ्या सैनिकांपैकी दोघे जण चंद्रवर्माकडे आले आणि म्हणाले

"आम्हांला सर्पकेतूची सेना कोठेच दिसली नाही. पण शत्रूच्या पावलांच्या खुणा मात्र स्पष्ट दिसत होत्या. त्यांवरून असे वाटते की ते सर्वजण पश्चिमेच्या बाजूला काढीत गेले असावेत.”

हे ऐकतांच चंद्रवर्मा धीरमल्लाकडे वळून म्हणाला

"मला वाटतें, सर्पकेतू माहिष्मती नगराच्या बाजूला न जातां कांशाच्या किल्लाच्या बाजूला गेल्या सारखा वाटतो आहे. आम्हांला हि तसेच वाटते आहे." धीरमल्ल व सुबाहु दोघे हि म्हणाले.

चंद्रवर्मा कोठे जावे ह्या विचारांत पडला, माहिष्मतीला की काशाच्या किल्लाच्या बाजूला..! थोडा वेळ त्याने विचार केला आणि शेवटी निश्चय केला की कांशाच्या किल्लाच्या बाजूला जाऊन सर्पकेतूला ठार करून मग परतावें. चंद्रवर्मानें तसे ठरवून सैन्यास कळविले की सर्व सैन्याने आगे कूच करण्यासाठी सिद्ध होऊन यावे. थोड्याच वेळांत सर्व सैन्य जमले आणि पुढील प्रवास सुरु झाला.

चंद्रवर्मा, सैन्य सर्पकेतूच्या सैन्याचा सुगावा काढीत काढीत चालले होतें. सर्पकेतूचे सैन्य डोंगर, जंगल, रान सर्व पार करून एका मोठ्या नदी काठापर्यंत गेले होते, हे पायाच्या खुणांवरून स्पष्ट दिसत होते. परंतु पुढे ते कोठे गेले असावे हे कळण्यास काही मार्ग नव्हता. चंद्रवर्मा पावलांच्या खुणांच्या रोखाने नदीपर्यंत गेला. पुढे त्या सैन्याने एवढी मोठी नदी कशी पार केली असेल? म्हणून आश्चर्य करूं लागला. नदीच्या अफाट पात्राकडे पाहात चंद्रवर्मा उभा होता. एकाएकी त्याना जवळच सांपाचा फूत्कार ऐकू आला, आवाजाच्या दिशेने त्याने वळून पाहिले तोच एक फार मोठा तीन तोंडाचा साप घडामकन् झाडावरून खाली पडला.

सर्वांची गाळण उडाली. चंद्रवर्मा देखील चार पावले मागे सरला. पाहाता पाहातां त्या सांपाचा माणूस झाला व तो

“चंद्रवर्मा...!!”

अशा हाका मारीत त्याच्याकडे धावत आला. चंद्रवर्माने पुढे होऊन पाहिले. तो कालकेतू होता. चंद्रवर्मानें त्याला ओळखलें.

“कालकेतू...!"

असें म्हणत त्याने कौतुकाने त्याचा हात धरून खांद्यावर याप मारली.

“चंद्रवर्मा, तूं मला ओळखलेंस याबद्दल पला फार आनंद झाला. तुमचा शत्रु सर्पकेतू थोड्या वेळापूर्वीच नदी पार करून गेला. तो ज्या होड्या व पडावांत बसून गेला ते पडाव व होडयानी या किनाऱ्यावर आणून ठेविल्या आहेत. त्या झाडाखाली.”

असे सांगून तो चंद्रवर्माचा हात धरून त्याला तिकडे नेऊ लागला. तो म्हणाला

"मी तुझ्या कृपेमुळे मनुष्य झालो, कपालिनीला मरून फार दिवस झाले. मरतांना तो वर्तमान भूत भविष्य दाखविणारा गोल आणि ती माणसाची कवटी तिने मला दिली. म्हणूनच तुमच्यावर आलेल्या संकटाची मला कल्पना आली. मी तुम्हाला मदत करण्यासाठीच धांवत धांवत येथें आलों, आपण पाहू या का आपला शत्रु सर्पकेतू कोठे असेल तो?"

कालकेतूने झाडाच्या आड ठेवलेला गोल काढून घेतला आणि कवटीला स्पर्श केला. त्याबरोबर त्या गोलांत त्यांना काहीतरी दिसू लागले. त्या गोलांत त्यांनी पाहिले तो त्यांना दिसले की कांशाचा किल्ला सूर्यकिरणांनी सळपल आहे. किल्लाच्या तटाचा उत्तर दखाजा उघडा असून कांही शिपायी तेथे पाहारा देत आहेत. किल्ल्यांत जागोजागी पडलेल्या इमारतींचे चबूतरे आहेत. तेथे सर्पकेतूने सैनिक हिंडून फिरून रसद गोळा करीत आहेत.

“पाहिलेत?" कालकेतु म्हणाला.

“असें म्हणतात की कांशाच्या किल्लाचा तट समुद्राला लागून आहे. पण वास्तविक तसें दिसत नाही. अगदी सुरवातीला तो तसा होता. पण सुमारे शंभर वर्षापूर्वी एकदां समुद्र फार खवळला आणि त्याच्या गगनचुंबी लाटांनी तो किल्ला पाण्यात बुडून गेला. नंतर हळू हळू समुद्र मागे हटत गेला आणि इतका हटला की आता तो किल्ला समुद्रापासून एक कोस अंतरावर आहे. आपण जर किल्लाला वेढा घालावयाचे म्हटले तर काही अशक्य नाही.” कालकेतूने सुचविलें.

कालकेतूची कल्पना त्याला पटली. लगेच त्या होड्या व पडावांच्या मदतीने त्यांनी आपले सैन्य नदीपार नेले. कालकेतु एका घोड्यावर बसून सैन्याच्या पुढे पुढे चालला होता आणि सारें सैन्य त्याच्या पाठोपाठ चालले होते. सर्व सैन्य वायुगतीने मार्ग कापीत चालले होते. सुमारे तासभर चालल्यावर त्यांना कांशाच्या किल्लयाच्या उंच उंच भिंती दिसू लागल्या. कालकेतु त्या सर्वांना घेऊन किल्लाच्या उत्तरेकडील दरवाज्याकडे गेला.

पण जवळ गेल्यावर दरवाजा तो बंद असल्याचे त्यांना आढळून आले. चंद्रवर्मा, सुबाहु व सेनापति धीरमल्लाला घेऊन दरवाज्याच्या अगदी जवळ गेला आणि पाहिले, परंतु किल्याचे दरवाजे चांगले मजबूत असल्याचे त्यांच्या नजरेस पडलें. आता हे दरवाजे तोडून आंत कसे जावयाचे??? चंद्रवर्माला प्रश्न पडला. किल्लाच्या भिंतीवर कोणी ओरडत असल्याचा आवाज त्यांना ऐकू आला. म्हणून त्यांनी वर पाहिले, तर सर्पकेतू आपल्या सैनिकांच्या मदतीने पोती, टोपल्या वगैरे भरभरून तटावर चढवीत असल्याचे त्यांना दिसले. सपकेतूनें चंद्रवर्माचे सैन्य पाहिले. घोडा विचार केला. नंतर चंद्रवर्माच्या सैनिकांना म्हणाला

“हे पहा, आमच्या जवळ ही जी पोती, टोपल्या, पिशव्या भरलेल्या दिसत आहेत ना? त्या सर्व हिऱ्या-माणकांनी आणि सोन्या चांदीने भरलेल्या आहेत. चंद्रवर्माला सोडून देऊन जे कोणी माझ्या बाजूला येतील त्यांना मी एवढेच सोने आणि मोती देईन. पहा, ज्याची ज्याची येण्याची इच्छा असेल त्याच्यासाठी दरवाजा उघडवितो."

त्यांचा विश्वास बसावा म्हणून सर्पकेतूनें दोन तीन पोती हिरे माणकें चंद्रवर्माच्या सैन्यावर उधळली. ती वेचण्यासाठी सैनिकांत धक्काबुको सुरू आली. आतां प्रश्न जरा पेंचाचा येणार हे ओळखून चंद्रवर्मा सुबाहूला म्हणाला

"तूं आपल्या वीरपूरच्या सैनिकांना घेऊन जा व सर्पकेतूच्या पक्षांत मिळाल्याचे सोंग कर व दरवाजा उघडावयास सांग, त्याने तुझ्यावर विश्वास ठेवून दरवाजा उघडला की धीरमल्ल बाकी सैन्य घेऊन तुझ्या पाठोपाठ आत शिरेल. तेथे आपण शात्रु, सैन्याचा नाश करूं."

सर्पकेतूची घोषणा ऐकूनच जसे काही सुबाहू आपल्या सैन्याकडे पळाला. आपलें सैन्य एका बाजूला नेऊन त्यांच्याशी काही तरी मंत्रणा केली व तेथून एकाएकी

"सर्पकेतू महाराज की जय..!!" "सर्पकेतू महाराज की जय..!!”

असे ओरडत तो दरवाज्याकडे धांवला. काही सैनिक जयजयकार करीत त्याच्या पाठोपाठ निघाले. एक दोन तुकड्यांनी जणू त्यांच्याशी युद्ध करण्याचे नाटक केले. हे सर्व पाहून सर्पकेतूला बरे वाटले, आपले काम सोळा आणे फत्ते झाले असे वाटून त्याला आनंद झाला आणि त्याने पाहारेकऱ्याना दरवाजा उघडण्याची आज्ञा दिली. त्याने विचार केला आता या सैन्य बळावर क्षणार्धात चंद्रवर्माला नामशेष करता येईल.

सर्पकेतूची आज्ञा मिळतांच सर्पकेतूच्या रक्षकांनी किल्लाचे दार उघडलें. सुबाहु आपले सैन्य घेऊन आंत गेला. त्याच्या पाठोपाठ धीरमल्ल व चंद्रवर्मा सुद्धा आपापली सेना घेऊन आंत घुसले. आंल घुसताच चंद्रवर्माच्या सैन्याने सर्पकेतूच्या सैन्याची कत्तल करण्यास आरंभ केला. सुबाहूच्या व धीरमलाच्या सैन्याने हि सर्षकेतूच्या सैन्यावर हल्ला केला.

एक क्षणार्धात परिस्थिति बदलली. सर्पकेतूचे सैन्य किंकर्तव्य विमूढ होऊन सैरावैरा पळू लागले. आपण चांगलेच फंसलों असे पाहून सर्पकेतूचा जळफळाट झाला. त्याने आपल्या तटावरील सैन्याच्या मदतीने शत्रूवर दगडफेंक करण्यास सुरवात केली. हे पाहून चंदवर्मा सुचावला म्हणाला

"सर्पकेतूला जिवंत पकडतां आलें तर पहा. नाही तर त्याला सरळ तलवारीचे पाणी दाखवू."

सुबाहू काही सैनिकांना घेऊन किल्लाच्या भिंती जवळ गेला आणि मितीच्या पडीक भागांतून हळू हळू चढत तटावर चढला. पण सर्पकेतूला पाहून सुबाहुनें अंदाज केला की याला जिवंत पकडणे साध्य नाही. इतक्यांत सर्पकेतु उन्मत्त हत्तीपमाणे सुबाहच्या सैन्यावर तुटून पडला. त्याचा तो पराक्रम पाहून चंद्रवर्माचे सैन्य सैरावैरा पळू लागले. तितक्यांत चंद्रवर्माला कालकेतूची आरोळी ऐकू आली

“चंद्रवर्मा सर्पकेतूचे आव्हात स्वीकार करण्याची शक्ति या कालकेतूंत आहे. तूं निश्चित रहा. पाहातो तो कसा माझ्या हातांतून निसटून जातो. तो स्वत:चा कडेलोट करून घेण्याच्या खटपटीत आहे. त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न केला पाहिजे."

कालकेतूचा आवाज ओळखून सर्पकेतु तिकडे वळला. काल केतूने त्याच्या तलवारीचा बार चुकवून उलट त्याच्यावर बार करीत म्हटलें

"सर्पकेतु, आतां तूं कालकेतूसमोर उभा आहेस हे विसरूं नकोस, कालकेतू म्हणजे तीन फडांचा नाग ! समजलास....!!”

असें म्हणत त्याने एकदम आपले रूप बदलले. सर्पकेतूला समोर एक तीन फडांचा नाग दिसला. सर्पकेत मार्गे सरकू लागला पण आणि किल्लाच्या मितीपर्यंत येऊन पोचला. मागे पळण्यास मार्ग नसल्यामुळे शेवटीं तो खाली खंदकांत पडला.

चंद्रवर्मा व धीरमल्ल त्याच्याजवळ थांवत गेले. पण ते पाचवण्या पूर्वीच सर्पकेतूची इहलोकाची यात्रा संपली होती. सर्पकेतूचे सर्व सैनिक चंद्रवर्माला शरण गेले. कालकेतूनें चंद्रवर्माजवळ विनंति केली की उरलेले आयुष्य कांशाच्या किल्ल्यात घालविण्यास त्याला परवानगी मिळाली. चंद्रवर्मांनी ताबडतोच ती विनंति मान्य केली.

चंद्रवर्मानें ती रात्र कांशाच्या किल्लयांतच काढली. उजाडल्यावर त्याला किल्लगंत जितकें धन मिळाले ते बरोबर घेऊन तो रुद्रपुराकडे निघाला. दोन तीन दिवस प्रवास केल्यावर तो रुद्रपुरांस येऊन पोचला. तेथील नागरिकांकडून त्याला कळले की शिवसिंहानें वनप्रस्थाश्रम ग्रहण केला आहे. चंद्रवर्माने शिवसिंहाचा मुलगा देवल याचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटाने करून त्याला गादीवर बसविलें.

चंद्रवर्मा माहिष्मती नगरीहून थोड्या अंतरापर्यंत पोचला असेल पोंचला असेल त्यापूर्वीच नागरिकांना सर्पकेतूच्या मृत्यूची बातमी कळली होती. म्हणून ते मंगलमय होऊन चंद्रवर्माच्या स्वागतासाठी सामोरे आले व त्यांनी माहिष्मतीचा चक्रवर्ती राजा होण्याची त्याच्याजवळ विनंति केली. परंतु चंद्रवर्मानें त्यांना सांगितले की यशोवर्धन महाराजांचा मोठा मुलगा तपोवर्धन याला गादीवर बसविणेच बरोबर होईल. महिष्मती नगरा नजीकच्या रानांत तपोवर्धन तप करीत होता. चंद्रवर्मानें त्याला आदरपूर्वक बोलावून आणलें व सिंहासन स्वीकारण्याची विनंति केली. परंतु तपोवर्धन राजाने ते मान्य केले नाही.

“तू राजा होण्यास योग्य आहेस असे सांगून चंद्रवर्माच्याच डोक्यावर राज्यमुकुट ठेवला."

प्रजेने आपल्या नव्या राजाचा जयजयकार केला.

चंद्रवर्मानें विश्वासपात्र धीरमल्ल व सुबाहु यांस अनुक्रमे आपला पंतप्रधान व प्रधान सेनापति म्हणून नेमलें.

चंद्रवर्माच्या राज्यांत त्याची प्रजा सुखी झाली.