कर्क
कर्क राशीचे लोक भावूक, शांत आणि उत्साही असतात. हे लोक इतरांच्या भावना चांगल्या प्रकारे समजून घेतात. जीवनात सतत पुढे जाण्याची इच्छा हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. परंतु त्यांच्यात सहनशीलता कमी आहे. त्यांना स्वतःची स्तुती ऐकायला आवडते.
पॉजिटिव्ह
२०२२ या वर्षाची सुरुवात आव्हानात्मक असू शकते. पण वर्षाच्या मध्यात परिस्थिती अनुकूल होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुमच्या समस्यांवर योग्य तोडगा निघेल. मित्र आणि कुटुंबातील सदस्य तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत मदत करतील. अविवाहितांसाठी हे वर्ष चांगली बातमी देणारे आहे. एप्रिलपासून मुलाखत, स्पर्धा परीक्षेत तरुणांना यश मिळण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना हे वर्ष चांगल्या संधी देणारे ठरणार आहे.
निगेटिव्ह
या वर्षात उत्पन्नासोबत खर्चही जास्त होईल. त्यामुळे बचत करण्यात अडथळे येणार आहेत. आर्थिक बाबतीत कोणावरही विश्वास ठेवू नका अन्यथा तुमची फसवणूक होईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागणार नाही. घर आणि वाहन संबंधित दुरुस्तीची कामे वेळेवर आटपून घ्या. लक्षात ठेवा की काही लोक तुमच्या भावनांचा गैरफायदा घेऊ शकतात. आपल्या मुलांवर अभ्यास किंवा करिअरसाठी दबाव टाकण्याऐवजी त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. अन्यथा त्यांना नैराश्य येऊ शकते.
व्यवसाय
वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या मनात व्यवसायाबाबत संभ्रम निर्माण होईल. विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. एप्रिलपासून परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होतील. व्यवसाय वाढवण्याच्या योजनांना आकार देण्यातही यश मिळेल. कर्ज, कर, सरकारी बाबी यासारख्या कामात येणारे अडथळे दूर होतील. नोकरदारांना काही चांगल्या संधी मिळतील आणि प्रगती होऊ शकेल. केवळ अधिकाऱ्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये सामंजस्य असणे आवश्यक आहे.
प्रेम
या वर्षी आपण कामात खूप व्यस्त राहाल पण असे असल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. विशेषत: पती आणि पत्नीने परस्पर सौहार्द राखणे महत्त्वाचे आहे. घराच्या व्यवस्थेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. काही जुने मित्र भेटतील आणि नंतर नात्यात जवळीक निर्माण होईल. या वर्षी काही अनपेक्षित प्रेम प्रकरणे होऊ शकतील पण त्याचा कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ देऊ नका.
आरोग्य
वर्ष २०२२ मध्ये तुमच्या आरोग्या संबंधी चढ उतार दिसून येतील. तथापि, कोणतीही गंभीर समस्या अपेक्षित नाही. बदलत्या ऋतूमानासोबत स्वत:ची काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याकडे लक्ष द्या. वर्षभर वाहने जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास निष्काळजीपणाने वागू नका आणि तातडीने उपचार घ्या.