Get it on Google Play
Download on the App Store

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक, मृदूभाषी आणि सहनशील असते. त्यांना कलाक्षेत्रात विशेष रस असतो. हे लोक मेहनती असतात पण पुढे जाण्यासाठी त्यांना अनेकदा कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज भासते.

पॉजिटिव्ह

या वर्षी आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. थांबून राहिलेले किंवा अडकलेले पैसे परत येण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मुलांचे शिक्षण, करिअर किंवा लग्नाशी संबंधित कामांवर खर्च होईल. त्याची चांगले फळही मिळतील. मालमत्तेच्या कामांच्या नियोजनासाठी हे वर्ष अतिशय अनुकूल असेल. सरकारी कामकाजाशी संबंधित समस्या दूर होतील. वर्षभर सामाजिक उपक्रमात तुम्ही सक्रीय राहाल.

निगेटिव्ह

या वर्षात उधळपट्टीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा आर्थिक अडचणी वाढू शकतात. जवळच्या लोकांशी वैयक्तिक बाबींमध्ये विश्वासघात होण्याची शक्यता आहे. इतरांच्या कारभारात ढवळाढवळ करण्याऐवजी स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करणे चांगले राहील. नातेवाईक आणि आप्तस्वकीयांकडून फारशी मदतीची अपेक्षा करू नका.

व्यवसाय

हे वर्ष तुमच्यासाठी व्यावसायिक यशांनी परिपूर्ण असेल. ज्या प्रकारचा बदल तुम्ही तुमच्या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न करत होता, आता त्याची वेळ आली आहे. वर्षाच्या सुरुवातीला विस्तारीकरणाच्या आराखड्यांवर काम केले जाणार आहे. परंतु शेअर मार्केट आणि सट्टाबाजाराशी संबंधित लोकांनी सावधगिरी बाळगावी. नोकरदार लोक त्यांचे लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी होतील.

प्रेम

हे वर्ष व्यस्ततेचे जाईल. पण तरीही कौटुंबिक सुखशांतीला तुमचे प्राधान्य असेल. घरातील मुलांच्या विवाहाशी संबंधित मांगलिक कामे पूर्ण होतील. परंतु प्रेमप्रकरणामुळे तुमचे करिअर किंवा अभ्यास प्रभावित होऊ शकतो. म्हणूनच सतर्क राहणे आणि मर्यादेत राहणे महत्वाचे आहे. मित्रांसोबत सामंजस्य राहील.

आरोग्य

आरोग्याच्या दृष्टीकोनातून या वर्षात काही अडचणी येतील. अमली पदार्थांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. या राशीच्या स्त्रिया स्त्री रोगांमुळे चिंताग्रस्त राहतील. कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे. रक्तदाब आणि मधुमेहाची नियमित तपासणी करून तुम्ही स्वतःला बर्‍याच अंशी निरोगी ठेवू शकाल.