मेष
मेष राशीचे लोक धैर्यपूर्ण आणि स्वाभिमानी असतात, ते इच्छित सन्मान आणि परिणाम प्राप्त करतात. पण इतरांच्या हाताखाली काम करायला त्यांना आवडत नाही. अशा प्रकारे त्यांची प्रगती होऊ शकत नाही. मेष राशीच्या लोकांना स्वतंत्र राहायला आवडते. या लोकांना स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
पॉझिटिव्ह
२०२२ हे वर्ष अनेक बदल घेऊन येत आहे. या वर्षात तुम्हाला इच्छित यश प्राप्त होईल. तुम्ही प्रत्येक परिस्थिती तुमच्या प्रविण्याने आणि कार्यक्षमतेने हाताळाल. सरकारी कामकाजात यश मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रखडलेल्या कामांना गती मिळेल. अनेक सुविधा प्राप्त होतील त्याचबरोबर आध्यात्मिक प्रगतीही होईल. अशा काही लोकांशी तुमचा संपर्क वाढेल जे तुमच्या प्रगतीसाठी मदत करतील उपयुक्त ठरतील. तुमच्या मालकीच्या नवीन स्थावर मालमत्ता होण्याच्या लक्षणीय शक्यता आहेत. या वर्षी तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वाबाबतही गंभीर व्हाल.
निगेटिव्ह
मेष राशीचे लोक अतिउत्साह आणि घाईमुळे अनेकदा आपले काम बिघडवतात. स्वतःचे परीक्षण करा आणि विचारपूर्वक स्वत:ला ओळखण्यासाठी थोडा वेळ द्या. हे वर्ष आनंदाने जगण्यासाठी तुम्हाला तुमच्या दिनचर्येमध्ये आणि वर्तनातही काळानुरूप बदल करावे लागतील. नाते संबंधाच्या बाबतीत सावध आणि सजग राहण्याची गरज आहे. भावनेच्या भरात तुमच्याकडून काही चुकीचे निर्णयही घेतले जाऊ शकतात. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सर्व बाजूंनी त्याचा विचार करा. या वर्षी विद्यार्थी आणि तरुणांनी अभ्यास आणि करिअरबाबत अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
व्यवसाय
व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष प्रगतीचे राहील. नवीन यश प्राप्त होईल. विस्तार योजनांवर काम सुरू होईल. पण शेअर मार्केट आणि जोखमीच्या कामांमध्ये हुशारीने पैसे गुंतवा. वर्षाच्या साधारण मध्यानंतर काही नवीन आव्हाने येतील. तथापि, तुम्ही त्यांना खंबीरपणे तोंड देण्यास सक्षम असाल. भागीदारीच्या व्यवसायात तुमचे कौशल्य आणि ज्ञान प्रगती करेल. नोकरदार मंडळीना त्यांच्या नोकरीतील योगदानामुळे परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सरकारी कामकाजाशी संबंधित व्यवसायात कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कृत्यांमध्ये रस घेऊ नका.
प्रेम
या वर्षात तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील. यासोबतच परस्पर समंजस्याने घराची व्यवस्था चांगली ठेवली जाईल. त्याचप्रमाणे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंधात गोडवा येईल. हे वर्ष विवाहितांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. तरुणांनी प्रेमसंबंधांमध्ये मर्यादेचे पालन करण्याची गरज आहे.
आरोग्य
वर्ष २०२२ मध्ये मेष राशीच्या व्यक्तींना तब्येतिच्या किरकोळ समस्या जाणवतील. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी. तथापि, तुमची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी व्यवस्थित ठेऊन तुम्ही समस्यांपासून बऱ्याच अंशी सुटका मिळवू शकता. या वर्षी हवामानाशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य चांगले राहील.