सार्थ श्रीसत्यनारायण पूजा कथा - अध्याय पाचवा
अध्याय पाचवा
सूत उवाच ॥ अथान्यच्च प्रवक्ष्यामि शृणुध्वं मुनिसत्तमा: ॥ आसीदंगध्वजो राजा प्रजापालतत्पर: ॥१॥
प्रसाद सत्यदेवस्य त्यक्त्वा दु;खमवाप स: ॥ एकदा स वनं गत्वा हत्वा बहुविधान्पशून॥२॥
आगत्य वटमूलं च दृष्ट्वा सत्यस्य पूजनम्॥ गोपा: कुर्वन्ति संतुष्टा भक्तियुक्त: सबांधवा: ॥३॥
राज दृष्ट्वा तु दर्पेण न गत्वा तं ननाम स: ॥ ततो गोपगणा: सर्वे प्रसाद नृपसन्निधौ ॥४॥
संस्थाप्य पुनरागत्य भुक्त्वा सर्वे यथेप्सितम्॥ तत: प्रसादं संत्यज्य राजा दु:खमवाप स: ॥५॥
सूत सांगतात, "मुनी हो, आणखी एक कथा सांगतो, ती श्रवण करा. पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा प्रजेचे पालन करण्याविषयी अतितत्पर होता. ॥१॥ त्याने प्रसादाचा त्याग केल्यामुळे त्याला अतिदु:ख प्राप्त झाले, ते असे- तो राजा एकदा अरण्यातून सिंह, वाघ इत्यादी प्राण्यांना मारून वडाच्या झाडाजवळ आला तो त्या ठिकाणी गवळी लोक आपल्या बांधवांसह भक्तियुक्त अंत:करणाने सत्यनारायणाचे पूजन करीत आहेत, असे राजाला दिसले. ॥२॥ ॥३॥ परंतु राजा हे सर्व पाहूनही त्या ठिकाणी गेला नाही व त्याने सत्यनारायण भगवंतास नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळी लोकांनी सत्यनारायणाचा प्रसाद राजापुढे आणून ठेवला; ॥४॥ व नंतर भक्तिभावाने सर्व गोपबांधवांनी प्रसाद भक्षण केला व आनंदी झाले. राजा मात्र प्रसादाच्या त्यागामुळे अतिदु:खी झाला. ॥५॥
तस्य पुत्रशतं नष्टं धनधान्यादिकं च यत्॥ सत्यदेवेन तत्सर्वं नाशितं मम निश्चितम्॥ ६ ॥
अतस्तत्रैव गच्छामि यत्र देवस्य पूजनम्॥ मनसा तु विनिश्चित्य ययौ गोपालसंनिधो ॥७॥
ततोऽसौ सत्यदेवस्य पूजां गोपगणै: सह ॥ भक्तिश्रद्धान्वितो भूत्वा चकार विधिना: नृप: ॥८॥
सत्यदेवप्रसादेन धनपुत्रान्वितोऽभवत्। इहलोके सुखं भुक्त्त्वा चांते सत्यपुरं ययौ ॥९॥
य इदं कुरुते सत्यव्रतं परमदुर्लभम्॥ शृणोति च कथां पुण्यां भक्तियुक्त: फलप्रदाम्॥१०॥
धनधान्यादिकं तस्य भवेत्सत्यप्रसादत: ॥ दरिद्रो लभते वित्तं बद्धो मुच्येत बंधनात्॥११॥
भीतो भयात्प्रमुच्यते सत्यमेव व संशय: ॥ ईप्सितं च फलं भुक्त्वा चांते सत्यपुरं व्रजेत्॥१२॥
इति व: कथितं विप्रा: सत्यनारायण व्रतम्॥ यत्कृत्वा सर्वदु:खेभ्यो मुक्तो भवति मानव:॥१३॥
त्या राजाचे शंभर मुलगे व धनधान्यादि सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेनेच झाले असेल असे राजाला वाटले, ॥६॥ व ज्या ठिकाणी गोपांनी सत्यनारायणाचे पूजन केले होते त्या ठिकाणी जाण्याचा निश्चय राजाने केला. ॥॥ नंतर गवळी लोकांच्या जवळ गेला व त्यांच्यासह भक्तिश्रद्धेने युक्त होऊन यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले. ॥८॥ त्यामुळे हा अंगध्वज राजा धन-पुत्र इत्यादी ऎश्वर्याने संपन्न झाला व या लोकात सुखी होऊन शेवटी वैकुंठलोकात गेला. हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजनामुळे झाला म्हणून सर्वांनी सत्यनारायणाचे पूजन अवश्य करावे. ॥९॥ जो कोणी अतिदुर्लभ असे सत्यनारायणाचे व्रत करतो व फल देणारी अशी कथा भक्तिभावाने श्रवण करतो ॥१०॥ त्याला सत्यनारायणाच्या कृपेने धनधान्यादी सर्व वस्तूंचा लाभ होतो व जो दरिद्री असेल त्याला द्रव्य मिळते व जो बंधनात पडला असेल तो बंधनातून मुक्त होतो. ॥१०॥ जो भयभीत झाला असेल तो सत्यनारायणाच्या पूजनामुळे भीतीपासून मुक्त होतो. इच्छित संपूर्ण ऎश्वर्य या लोकी भोगून अंती सत्यनारायणाच्या नगरास जातो. ॥१२॥ ऋषीहो, जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो, ते हे सत्यनारायणाचे व्रत तुम्हाला सांगितले. ॥१३॥
विशेषत: कलियुगे-सत्यपुजा फलप्रदा ॥ केचित्कालं वदिष्यंति सत्यमीशं तमेव च ॥ सत्यनारायणं केचित्सत्यदेवं तथापरे ॥१४॥
नानारूपधरो भुत्वा सर्वेषामीप्सितप्रद: ॥ भविष्यति कलौ सत्यव्रतरूपी सनातन: ॥१५॥
य इदं पठते नित्यं शृणोति मुनिसत्तमा: ॥ सत्यं नश्यंति पापानि सत्यदेवप्रसादत: ॥१६॥
इति श्रीस्कंदंपुराणे रेवाखंडे सत्यनारायणव्रतकथायां पंचमोऽध्यायां ॥
विशेषत्वेकरून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव व कोणी सत्यनारायण असे म्हणतात. ॥१३॥ ॥१४॥ नानारूपे धारण करुन सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान्कलियुगात सत्यनारायणव्रतरूपी होईल. ॥१५॥ मुनिश्रेष्ठहो, जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठण करील किंवा श्रवण करील त्याची सर्व पापे श्रीसत्यनारायणाच्या कृपेने नाहीशी होतील. ॥१६॥ या ठिकाणी श्रीसत्यनारायण कथेतील पाचवा अध्याय संपूर्ण झाला.
॥हरये नम: हरये नम: हरये नम: ॥
॥इति पंचमोऽध्याय: समाप्त: ॥