सार्थ श्रीसत्यनारायण पूजा कथा - अध्याय चौथा
अध्याय चौथा
सूत उवाच ॥ यात्रां तु कृतवान्साधुर्मंगलायनपूर्विकाम्॥ ब्राह्मणाय धनं दत्त्वा तदा तु नगरं ययौ ॥१॥
कियद्दुरे गते साधौ सत्यनारायण: प्रभु: ॥ जिज्ञासां कृतवान्साधो किमस्ति तव नौस्थितम्॥२॥
ततो महाजनौ मत्तौ हेलया च प्रहस्य वै ॥ कथं पृच्छसि भॊ दंडिन्मुद्रां नेतु किमिच्छसि ॥३॥
लतापत्रादिकं चैव वर्तते तरणौ मम ॥ निष्ठुरं च वच: श्रुत्वा सत्यं भवतु ते वच: ॥४॥
एवमुक्त्वा गत: शीघ्रं दंडी तस्य समीपत: ॥ कियद्दॄरे ततो गत्वा स्थित: सिंधुसमीपत: ॥५॥
गते दंडिनि साधुश्च कृतनित्यक्रियस्तदा ॥ उत्थितां तरणीं दृष्ट्वा विस्मयं परमं ययौ ॥६॥
नंतर साधुवाण्याने आपणास वाटेत विघ्ने येऊ नयेत म्हणून ब्राह्मणांस दक्षिणा देऊन आशिर्वाद घेतला व जावयासह स्वत;चे नगरास गेला. ॥१॥ तो साधुवाणी काही थोडा दूर गेल्यावर संन्यासवेष धारण करणार्या सत्यनारायणप्रभूंनी साधुवाण्याची परीक्षा करण्यासाठी "हे साधो, या तुझ्या नौकेत काय आहे, ते सांग" असा प्रश्न विचारला. ॥२॥ धनाने उन्मत्त झालेले ते दोन वाणी त्याची निंदा करून हसू लागले व म्हणाले, "संन्यासीबुवा, आमचे द्रव्य नेण्याची तुमची इच्छा आहे काय? ॥३॥ आमची नौका वेली व पाने यांनी भरलेली आहे." असे साधुवाण्याचे उन्मत्तपणाचे भाषण ऎकून भगवान्म्हणाले, "तुझे बोलणे खरे होवो." ॥४॥ असे बोलून संन्यासवेष धारण करणारे भगवान्तेथून गेले व तिथूनथोड्याच अंतरावर असलेल्या समुद्राच्या तीरावर बसले ॥५॥ संन्यासी दूर गेल्यावर साधुवाण्याने आपले नित्यकर्म केले व नौकेकडे गेला आणि पाहिले तर हलकेपणामुळे नौका वर आलेली पाहून साधुवाणी आश्चर्यचकित झाला. ॥६॥
दृष्ट्वा लतादिकं चैव मूर्च्छितां न्यपतद्भुवि ॥ लब्धसंज्ञो वणिक्पुत्रस्ततश्चिंतान्वितोऽभवत्॥७॥
तदा तु दुहित:कांतो वचनं चेदमब्रवीत्॥ किमर्थं क्रियते शोक:शापो दत्तश्च दंडिना ॥८॥
शक्यते तेन सर्वं हि कर्तुं चात्र न संशय: ॥ अतस्तच्छरणं यामो वांछितार्थो भविष्यति ॥९॥
जामातुर्वचनं श्रुवा तत्सकाशं गतस्तदा ॥ दृष्ट्वा च दंडिनं भक्त्या नत्वा प्रोवाच सादरम्॥१०॥
क्षमस्व चापराधं मे यदुक्तं तव सन्निधौ । एवं पुन: पुनर्तत्वा महाशोकाकुलोऽभवेत्॥११॥
प्रोवाच वचनं दंडी विलपंतं विलोक्य च ॥ मा रोदी: शृणु मद्वाक्यं मम पूजाबहिर्मुख: ॥१२॥
ममाज्ञया च दुर्बुद्धे लब्धं दु:खं मुहुर्मुहु: ॥ तच्छुत्वा भगवद्वाक्यं स्तुतिं कर्तुं समुद्यत: ॥१३॥
साधुरुवाच ॥ त्वन्मायामोहिता: सर्वे ब्रह्माद्यास्त्रिदिवौकस: ॥ न जानंति गुणान्रूपं तवाश्चर्यमिदं प्रभॊ ॥१४॥
नौकेत वेली व पाने पाहून तो साधुवाणी मूर्च्छा येऊन जमिनीवर पडला. नंतर थोड्यावेळाने सावध होऊन चिंता करू लागला. ॥७॥ त्या वेळी साधुवाण्याचा जावई म्हणाला, "महाराज, आपण शोक का करता? संन्याशाने जो आपणास शाप दिला त्यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे ॥८॥ तो संन्यासी पाहिजे ते करण्यास समर्थ आहे, म्हणून आपण त्याला शरण जाऊ म्हणजे आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील." ॥९॥ असे जावयाचे भाषण ऎकून साधुवाणी यतीजवळ गेला व त्याला पाहून भक्तीने नमस्कार केला व आदराने बोलू लागला. ॥१०॥ "महाराज, मी जे आपल्याजवळ खोटे बोललो त्या अपराधाची क्षमा करा." असे म्हणून पुन: पुन्हा नमस्कार केला व तो साधुवाणी अतिशय दु:खी झाला. संन्यासवेषधारी भगवान्शोक करणार्या साधुवाण्याला म्हणाले, "शोक करू नकोस. ॥११॥ मी सांगतो ते ऎक. तू माझ्या पूजनाविषयी पराङमुख आहेस ॥१२॥ व म्हणूनच माझ्या आज्ञेने तुला वारंवार दु:ख प्राप्त झाले." हे ऎकून साधुवाणी भगवंताची स्तुती करू लागला. ॥१३॥ साधुवाणी म्हणाला, "तुझ्या मायेने मोहित झालेले ब्रह्मादिक देवही तुझे गुण व रूप हे जाणू शकत नाहीत. हे प्रभॊ, हे आश्चर्य आहे." ॥१४॥
मूढोऽहं त्वां कथं जाने मोहितस्तव मायया ॥ प्रसीद पूजयिष्यामि यथाविभवविस्तरै: ॥१५॥
पुरावित्तं च तत्सर्वं त्राहि मां शरणागतम्॥ श्रुत्वा भक्तियुतं वाक्यं परितुष्टो जनार्दन: ॥१६॥
वरं च वांच्छितं दत्वा तत्रैवांतर्दधे हरि: ॥ ततो नावं समारुह्य दृष्ट्वा वित्तप्रपूरिताम्॥१७॥
कृपया सत्यदेवस्य सफलं वांछितं मम । इत्युक्त्वा स्वजनै: सार्धं पूजां कृत्वा यथाविधि ॥१८॥
हर्षेण चाभवत्पूर्णं सत्यदेवप्रसादत: । नावं संयोज्य यत्नेन स्वदेशगमन कृतम्॥१९॥
साधुर्जामातरं प्राह पश्य रत्नपुरीं मम ॥ दूतं च प्रेषयामास निजवित्तस्य रक्षकम्॥२०॥
दूतोऽसौ नगरं गत्वा साधुभार्या विलोक्य च ॥ प्रोवाच वांच्छितं वाक्य नत्वा बद्धंजलिस्तदा ॥२१॥
निकटे नगरस्यैव जामात्रा सहितो वणिक्॥ आगतो बंधुवर्गेश्च वित्तैश्च बहुभूर्युत: ॥२२॥
श्रुत्वा दूतमुखाद्वाक्यं महाहर्षवती सती ॥ सत्यंपूजां कुरुष्वेति प्रोवाच तनुजां प्रति ॥
व्रजामि शीघ्रमागच्छ साधुसंदर्शनाय च ॥२३॥
तुमच्या मायेने मोहित झालेला मी मूर्ख आहे. मी आपणास कसा जाणेन? माझ्यावर कृपा करा. मी यथाशक्ती आपले पूजन करीन. ॥५॥ मी आपणास शरण आलो आहे. माझे रक्षण करा. माझे पूर्वीचे द्रव्य मला मिळावे." असे साधुवाण्याचे भक्तिभावयुक्त वाक्य ऎकून भगवान संतुष्ट झाले; ॥१६॥ व साधुवाण्याला इच्छित वर देऊन अदृश्य झाले. नंतर साधुवाण्याने नौकेवर जाऊन पाहिले तो पूर्वीप्रमाणे नौका द्रव्याने भरलेली आहे असे दिसले; ॥१७॥ व सत्यनारायणाच्या कृपेनेच हे सर्व मला मिळाले असे म्हणून साधुवाण्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे यथासांग पूजन केले, ॥१८॥ व सत्यनारायणाच्या कृपाप्रसादाने आनंदी आनंदझाला व प्रयत्नाने नौका नदीत लोटून आपल्या घरी गेला. ॥१९॥ नंतर साधुवाणी जावयाला म्हणाला, "ही पाहा माझी रत्नपुरीनगरी," असे बोलून द्र्व्याचे रक्षण करणारा एक दूत घरी पाठविला. ॥२०॥ तो दूत नगरात गेला व साधुवाण्याच्या भार्येला पाहून त्याने नमस्कार केला व हात जोडून तिला अपेक्षित असणारे वाक्य बोलू लागला. ॥२१॥ तो म्हणाला, "बांधव व पुष्कळ द्रव्य यांसह साधुवाणी जावयाला बरोबर घेऊन आपल्या नगराच्या जवळ आले आहेत." ॥२२॥ असे दूताचे वाक्य ऎकून आनंदी झालेल्या साधुवाण्याच्या भार्येने मुलीला 'सत्यनारायणाची पूजा कर' असे सांगितले व आपण लगेच पतिदर्शनासाठी गेली. ॥२३॥
इति मातृवच: श्रुत्वा व्रतं कृत्वा समाप्य च ॥ प्रसादं च परित्यज्य गतासाऽपि पतिंप्रति ॥२४॥
तेन रुष्ट: सत्यदेवो भर्तारं तरणीं तथा । संह्रत्य च धनै: सार्धं जले तस्यावमज्जयत्॥२५॥
तत: कलावती कन्या न विलोक्य निजं पतिम्॥ शोकेन महता तत्र रुदती चापतद्भुवि ॥२६॥
दृष्ट्वा तथाविधां नावं कन्यां च बहुदु:खिताम्॥२७॥ भीतेन मन्सा साधु: किमाश्चर्यमिदं भवेत्॥
चिंत्यमानाश्च ते सर्वे बभूवुस्तरिवाहका: ॥२८॥
ततो लीलावतीं कन्यां दृष्ट्वा सा विह्वालाऽभवत्। विलला पातिदु:खेन भर्तारं चेदमब्रवीत्॥२९॥
इदानीं नौकया सार्धं कथं सोऽभूदलक्षित: ॥ न जाने कस्य देवस्य हेलया चैव सा ह्रता ॥३०॥
सत्यदेवस्य माहात्म्य ज्ञातुं वा केन शक्यते ॥ इत्युक्त्वा विललापैव ततस्श्च स्वजनै: सह ॥३१॥
ततो लीलावती कन्यां क्रोडे कृत्वा रुरोद ह ॥३२॥
तत: कलावती कन्या नष्टे स्वामिनि दु:खिता ॥ गृहीत्वा पादुके तस्यानुगंतुं च मनो दधे ॥३३॥
आईचे वाक्य ऎकून तिने सत्यनारायणाचे व्रत पूर्ण केले. परंतु प्रसाद भक्षण न करता पतिदर्शनासाठी उत्सुक झालेली ती तशीच गेली, ॥२४॥ त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायणप्रभूंनी तिचा पती असलेली नौका द्र्व्यासह पाण्यात बुडविली. ॥२५॥ त्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या कलावतीला तिचा पती दिसला नाही, त्यामुळे अत्यंत शोकाने विव्हल होऊन ती रडत भूमीवर पडली.॥२६॥ बुडालेली नौका व त्यामुळे दु:खी झालेली आपली कन्या पाहून भयभीत अंत:करणाने साधुवाणी नावाड्यांसह हा काय चमत्कार, असे म्हणून विचार करू लागला. ॥२७॥ ॥२८॥ नंतर लीलावती आपल्या कन्येची ती अवस्था पाहून दु:खी झाली व आक्रोश करून आपल्या पतीला म्हणाली, ॥२९॥ "अहो, एवढ्या थोड्या अवधीत नौकेसह कलावतीचा पती कसा अदृश्य झाला? कोणत्या देवाच्या अवकृपेमुळे हे झाले? मला हे समजत नाही. ॥३०॥ नंतर तिने मुलीला पोटाशी धरले व रडू लागली. इतक्यात पती नाहीसा झाल्याने दु:खी झालेल्या कलावतीने पतीच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला. ॥३२॥ ॥३३॥
कन्यायाश्चतिरं दृष्टवा सभार्य: सज्जनो वणिक्॥ अतिशोकेन संतप्त श्चिंतयामासधर्मवित् ॥ ह्रतं वा सत्यदेवेन भ्रांतोऽहं सत्यमायया ॥३४॥
सत्यपूजां करिष्यामि यथाविभवविस्तरै: ॥ इति सर्वान्समाहूय कथयित्वा मनोरथम्॥ ३५ ॥
नत्वा च दंडवद्भूमौ सत्यदेव पुन:पुन: ॥ ततस्तुष्ट: सत्यदेवो दीनानां परिपालक: ॥३६॥
जगाद वचन व्योम्नि कृपया भक्तवत्सल: । त्यक्त्वा प्रसादं ते कन्या पतिं द्रष्टुं समागता ॥ अतोऽदृष्टोऽभवत्तस्या: कन्यकाया: पतिध्रुवम्॥३७॥
गृहं गत्वा प्रसादं च भुक्त्वा साऽऽयाति चेत्पुन: ॥ लब्धभर्त्री सुता साधो भविष्यति न संशय: ॥३८॥
कन्यका तादृशं वाक्यं श्रुत्वा गगनमंडलात्॥ क्षिप्रं तदा गृहं गत्वा प्रसादं च बुभोज सा ॥३९॥
सा पश्चात्पुनरागत्य ददर्श स्वजनं पतिम्॥४०॥
तत: कलावती कन्या जगाद पितरं प्रति ॥ इदानीं च गृहं याहि विलंबं कुरुषे कथम्॥४१॥
धार्मिक व सज्जन असा तो साधुवाणी भार्येसह मुलीचे अशा प्रकारचे चरित्र पाहून अतिशोकाने संतप्त झाला व सत्यनारायणानेच नौका नाहिशी केली असेल कारण त्याच्या मायेने मी मुग्ध झालो आहे. ॥३४॥ नंतर सर्वांना बोलावून साधुवाण्याने, 'माझे मनोरथ पूर्ण झाल्यास मी सत्यनारायणाचे पूजन करीन' असे सर्वांना सांगितले. ॥३५॥ आणि सत्यनारायणाला पुन: पुन्हा साष्टांग नमस्कार घातले. तेव्हा दीनांचे रक्षण करणारे सत्यनारायण संतुष्ट झाले व भक्तप्रेमी भगवान आकाशवाणीने म्हणाले, "हे साधो, तुझी कन्या प्रसादाचा त्याग करून आपल्या पतीच्या दर्शनासाठी आली आहे म्हणुन तिचा पती अदृश्य झाला. ॥३६॥ ॥३७॥ हे साधो, ही तुझी कन्या जर घरी जाऊन प्रसाद भक्षण करून येईल तर तिचा पती तिला प्राप्त होईल यात शंका नाही." ॥३८॥ आणि पुन्हा बंदरात येऊन पाहते तो तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. ॥४०॥ नंतर कलावती आपल्या पित्यास म्हणाली, "आता लवकर घरी चला, उशीर का करता?" ॥४१॥
तच्छुत्वा कन्यकावाक्यं संतुष्टोऽऽभूद्वणिक्सुत: ॥ पूजनं सत्यदेवस्य कृत्वा विधिविधानत: ॥४२॥
धनैर्बंधुगणै: सार्धं जगाम निजमंदिरम्॥ पौर्णमास्यां च संक्रांतौ कृतवान्सत्यपूजनम्॥४३॥
इहलोके सुखं भुक्त्वा चांते सत्यपुरं ययौ ॥४४॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे सत्यनारायणव्रतकथायां चतुर्थोऽध्याय: ॥
मुलीचे हे वाक्य ऎकून तो साधुवाणी अतिशय आनंदी झाला व त्याने यथाविधी सत्यनारायणाचे पूजन केले, ॥४२॥ व नंतर तो साधुवाणी धन व बांधव यांसह आपल्या घरी गेला व प्रत्येक पौर्णिमा व संक्रांत या दिवशी सत्यनारायणाचे पूजन करून या लोकी सुखी झाला व शेवटी सत्यनारायणप्रभूचे सत्य लोकात गेला. ॥४३॥ ॥४४॥ या ठीकाणी सत्यनारायणकथेतील चौथा अध्याय पुरा झाला. ॥४॥ हरये नम: ।
॥इति चतुर्थोऽध्याय: समाप्त: ॥