सार्थ श्रीसत्यनारायण पूजा कथा - अध्याय दुसरा
अध्याय दुसरा
श्रीभगवाननुवाच ॥ अथान्यत्संप्रवक्ष्यामि कृतं येन पुरा द्विज ॥ कश्चित्काशीपुरे रम्ये ह्यासीद्विप्रोऽतिनिर्धन: ॥१॥
क्षुत्तृड्भ्यां व्याकुलो भूत्वा नित्यं बभ्राम भूतले ॥ दु:खितं ब्राह्मनं दृष्ट्वा भगवान्ब्राह्मणप्रिय: ॥२॥
वृद्धब्राह्मणरूपस्तं पप्रच्छ द्विजमादरात्। किमर्थं भ्रमसे विप्र महीं नित्यं सुदु:खित: ॥३॥
तत्सर्वं श्रोतुमिच्छामि कथ्यतां द्विजसत्तम ॥ ब्राह्मण उवाच ॥ ब्राह्मणोऽतिदरिद्रोऽहं भिक्षार्थं वै भ्रमे महीम् ॥४॥
उपायं यदि जानसि कृपया कथय प्रभो । वृद्धब्राह्मण उवाच ॥ सत्यनारायणो विष्णुवांछितार्थफलप्रद: ॥५॥
भगवान म्हणाले, "नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो. ऎक, सुंदर अशा काशीनगरात एक दरिद्री ब्राह्मण राहात होता. (अध्याय २ श्लोक १) भूक व तहान यांनी पीडित होऊन तो ब्राह्मण पृथ्वीवर रोज फिरत असे. आचारनिष्ठ व धार्मिक ब्राह्मणांवर कृपा करणारा भगवान त्या दु:खी ब्राह्मणाला पाहून ॥२॥ भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशीनगरातल्या त्या ब्राह्मणाला प्रश्न विचारला, "हे ब्राह्मणा, तू दु:खी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतोस? ॥३॥ ते सर्व ऎकण्याची माझी इच्छा आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठा, ते तू मला सांग." हे वृद्ध ब्राह्मणरूपी भगवंताचे भाषण ऎकून तो ब्राह्मण म्हणाला. "मी अती दरिद्री ब्राह्मण आहे. मी भिक्षा मागण्यासाठी रोज पृथ्वीवर फिरतो. ॥४॥ हे भगवंता, दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय आपणास माहीत असेल तर तो कृपा करून मला सांगा." असे ब्राह्मणांचे भाषण ऎकून भगवान म्हणाले. "सत्यनारायण नावाचा विष्णु सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करून मनातील फल देणारा आहे. ॥५॥
तस्य त्वं पूजनं विप्र कुरुष्व व्रतमुत्तमम्॥ यत्कृत्वा सर्वदु:खेभ्यो मुक्तो भवति मानव: ॥६॥
विधानं च व्रतस्यापि विप्रायाभाष्य यत्नत: ॥ सत्यनारायणो वृद्धस्तत्रैवांतरधीयत ॥७॥
तद्व्रतं संकारिष्यामि यदुक्तं ब्राह्मणेन वै । इति संचिंत्य विप्रोऽसौ रात्रौ निद्रां न लब्धवान्॥८॥
तत: प्रात: समुत्थाय सत्यनारायणव्रतम्॥ करिष्य इति संकल्प्य भिक्षार्थमगमद्द्विज: ॥९॥
तस्मिन्नेव दिने विप्र: प्रचुरं द्र्व्यमाप्तवान्॥ तेनैव बंधुभि: सार्धं सत्यस्य व्रतमाचरत्॥१०॥
सर्वंदु:खविनिर्मुक्त: सर्वसंपत्समन्वित: ॥ बभूव स द्विजश्रेष्ठो व्रतस्यास्य प्रभावत: ॥११॥
तत: प्रभृति कालं च मासिमासि व्रतं कृतम्॥ एवं नारायणस्येदं व्रतं कृत्वा द्विजोत्तम: ॥ सर्वपापाविनिर्मुक्ती दुर्लभं मोक्षमाप्तवान्॥१२॥
व्रतमस्य यदाविप्र: पृथिव्यां संकरिष्यति ॥ तदैव सर्वदु:खं च मनुजस्य विनश्यति ॥१३॥
एवं नारायणेनोक्तं नारदाय महात्मने ॥ मया तत्कथितं विप्रा: किमन्यत्कथयामि व: ॥१४॥
"जे व्रत केले असता मनुष्य सर्व दु:खांतून मुक्त होतो त्या सत्यनारायणाचे पूजनात्मक उत्तम व्रत तू कर." ॥६॥ त्यानंतर ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण प्रभू तिथेच गुप्त झाले. ॥७॥ वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी अवश्य करीन असा ध्यास दरिद्री ब्राह्मणाला लागल्यामुळे त्याला रात्री निद्रा लागली नाही ॥८॥ नंतर तो ब्राह्मण सकाळी उठून 'मी आज सत्यनारायणाचे व्रत करीन' असा मनाशी निश्चय करून गावात भिक्षा मागण्यासाठी गेला. ॥९॥ त्याच दिवशी त्या ब्राह्मणाला खूप पैसा मिळाला व त्याने पूजनाची सर्व तयारी करून आपल्या बांधवांसह सत्यनारायणाचे पूजन केले. ॥१०॥ नंतर तो दरिद्री ब्राह्मण या सत्यनारायण व्रतामुळे सर्व दु:खांतून मुक्त झाला व धनधान्यांनी समृद्ध होऊन आनंदी झाला. ॥११॥ त्या वेळेपासून तो ब्राह्मण प्रत्येक महिन्याला सत्यनारायण व्रत करू लागला व या व्रतामुळे सर्व पापांतून मुक्त होऊन अंती दुर्लभ अशा मोक्षाला गेला. ॥१२॥ ब्राह्मणहो, ज्या वेळी हे सत्यनारायण व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावने करील त्या वेळी त्याचे सर्व दु:ख नाहीसे होईल. ॥१३॥ मुनिहो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले अन्य काय सांगू?" ॥१४॥
ऋषय ऊचु: ॥ तस्माद्विप्राच्छुतं केन पृथिव्यां चरितं मुने ॥ तत्सर्वं श्रोतुमिच्छाम: श्रद्धाऽस्माकं प्रजायते ॥१५॥
सूत उवाच ॥ शृणध्वं मुनय: सर्वे व्रतं येन कृतं भुवि । एकदा स द्बिजवरो यथाविभव विस्तरै: ॥१६॥
बंधुभि: स्वजनै: सार्धं व्रतं कर्तुं समुद्यत: ॥ एतस्मिन्नंतरे काले काष्ठक्रेता समागमत्॥१७॥
बहि:काष्ठं च संस्थाप्य विप्रस्य गृहमामयौ ॥ तृष्णया पीडितात्मा च दृष्ट्वा विप्रं कृतव्रतम्॥१८॥
प्रणिपत्य द्विजं प्राह किमिद क्रियते त्वया ॥ कृते किं फलमाप्नोति विस्तराद्वद मे प्रभो ॥ १९ ॥
विप्र उवाच ॥ सत्यनारायणस्येदं व्रतं सर्वेप्सितप्रदम्॥ तस्य प्रसादान्मे सर्वं धनधान्यादिकं महत्॥२०॥
तस्मादेतद्व्रतं ज्ञात्वा काष्ठक्रेताऽतिहर्षित: ॥ पपौ जलं प्रसादं च भुक्त्वा स नगरं ययो ॥२१॥
सत्यनारायणं देव मनसा इत्यचिंतयत्॥ काष्ठं विक्रयतो ग्रामे प्राप्यते चाद्य यद्धनम्॥२२॥
तेनैव सत्यदेवस्य करिष्ये व्रतमुत्तमम्॥ इति संचिंत्यं मनसा काष्ठं धृत्वा तु मस्तके ॥२३॥
ऋषी पुन्हा विचारतात, "त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऎकिले व नंतर कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले, ते सर्व ऎकण्याची इच्छा आहे व श्रद्धा पण आहे." ॥१५॥ सूत म्हणतात, "मुनिहो, हे व्रत पृथ्वीवर कोणी केले ते सांगतो, ते ऎका. एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाप्रमाणे आपले बांधव व इष्टमित्र यांसह आनंदाने व भक्तीने हे व्रत करीत असताना लाकडे विकणारा मोळीविक्या त्या ठिकाणी आला. ॥१६॥ ॥१७॥ तो मोळीविक्या तहानेने च्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरील मोळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी गेला व तो व्रत करीत आहे असे पाहून ॥१८॥ त्याला नमस्कार केला व विचारले, "महाराज, आपण काय करीत आहात? व हे व्रत केल्याने काय फळ मिळते, ते विस्तारपूर्वक सांगा." ॥१९॥ ब्राह्मण म्हणाला, "सर्व इच्छा पूर्ण करणारे असे हे सत्यनारायणाचे व्रत आहे. त्याच्याच कृपाप्रसादाने मला पुष्कळ धनधान्य मिळाले आहे." ॥२०॥ नंतर त्या मोळीविक्याने हे व्रत समजावून घेतले व अती आनंदाने प्रसाद भक्षण करून पाणी पिऊन शहरात मोळी विकण्यासाठी गेला. ॥२१॥ सत्यनारायणाचे चिंतन करीत लाकडाची मोळॊ मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून जे द्रव्य मिळेल त्या द्र्व्याने मी सत्यनारायणाचे उत्तम पूजन करीन असा मनाशी त्याने निश्चय केला व ॥२२॥ २३ ॥
जगाम नगरे रम्ये धनिनां यत्र संस्थिति: ॥ तद्दिने काष्ठमूल्यं च द्बिगुणं प्राप्तवानसौ ॥२४॥
तत: प्रसन्नह्रदय: सुपक्वं कदलीफलम्।। शर्करां घृतदुग्धे च गोधूमस्य च चूर्णकम्॥२५॥
कृत्वैकत्र सपादं च गृहीत्वा स्वगृहं ययौ ॥ ततो बंधून् समाहूय चकार विधिना व्रतम्॥२६॥
तदव्रतस्य प्रभावेण धनपुत्रान्वितोऽभवत्॥ इहलोके सुखं भुक्त्वा चांते सत्यपुरं ययौ ॥२७॥
इति श्रीस्कंदपुराणे रेवाखंडे श्रीसत्यनारायणव्रतकथायां द्वितीयोऽध्याय: ॥२८॥
धनिक लोक ज्या नगरात राहात होते तिथे तो गेला व त्या दिवशी त्याला दुप्पट द्रव्य मिळाले. ॥२४॥ नंतर त्याने आनंदी अंत:करणाने उत्तम पिकलेली केळी, साखर, तूप, दूध, गव्हाचा रवा सव्वा या प्रमाणात खरेदी करून आपल्या घरी आला व आपले बांधव व इष्टमित्र यांना बोलावून विधिनोक्त रीतीने यथासांग सत्यनारायणाचे पूजन केले. ॥२५॥ ॥२६ ॥ या सत्यनारायणव्रताच्या प्रभावाने तो मोळीविक्या धनधान्य व पुत्र इत्यादी संपत्तीने युक्त झाला व या लोकात सुख भोगून शेवटी सत्यनारायण प्रभूंच्या लोकी गेला. ॥२७ ॥ या ठिकाणी सत्यनारायण कथेतील दुसरा अध्याय पुरा झाला. ॥२॥ हरये नम:
॥अथ द्वितीयोऽध्याय: समाप्त ॥