खुन्या गणपती, भोईगल्ली धुळे.
धुळे शहराच्या खोंबोटे भोई गल्ली येथे हे गणेश मंदिर स्थित आहे. या गणपतीला खुन्या गणपती म्हणतात.
भोई समाजातील काही लोकांना ही मूर्ती १८६५ सामी एका निर्जन स्थळी सापडली.
ही मूर्ती पुढे जाऊन प्राणप्रतिष्ठित करण्यात आली आणि त्या मूर्ती भोवती मंदिर ही बांधण्यात आले.
ही गणेशमूर्ती पूर्वाभिमुख आहे. शिवाय गणेशची मूर्ती उजव्या सोंडेची असून मंदिराला तांब्याचा कळस आहे.
मुंबई ते धुळे रेल्वेने ४५० कि.मी. आहे. पुढे दीड किलोमीटर पायी जाण्याचे अंतर आहे.