सुभाषित माला पुष्प ९
बर्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे , व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्हास झाल्यामुळे बर्याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही . पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास या प्रयोगामुळे संस्कृत सुभाषिते माहीत होतील .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल
नरत्वं दुर्लभं लोके विद्या तत्र सुदुर्लभा।
शीलं च दुर्लभं तत्र विनयस्तत्र सुदुर्लभः॥
मनुष्याचा जन्म मिळणे कठीण असते. त्यातही शिक्षण मिळण अजून अवघड असत त्यातही चारित्र्य संपादन करणं अधिक कठीण आणि एवढ [असूनही ] नम्रपणा [असणारा ] फारुच विरळा .
विनयस्तत्र सुदुर्लभ:एवढे वचन वापरले तरीही संपूर्ण आशय लक्षात येतो .नरजन्म ,विद्या, चारित्र्य, आणि त्याबरोबरच नम्रपणा या चार गोष्टी एकत्र असणे दुर्लभ आहे .--विद्या विनयेन शोभते असे संस्कृत वचन आठवले .मनुष्य जन्म असेल ,परंतु चारित्र्य नसेल; विद्या असेल , परंतु गर्व मग्रुरी उर्मटपणा अहंकार असेल ;.तर मनुष्य जन्माचा व विद्येचा काय उपयोग ?नरजन्म विद्या चारित्र्य आणि नम्रपणा हे सर्व एकत्र असणे जरा दुर्मिळच .दूध साखर केशर आणि त्याला वेलचीचा सुगंध या गोष्टी एकत्रित असलेल्याप्रमाणे मिश्रणाप्रमाणेअसा मनुष्य मधुर असेल .
स्मरणीय
विनयस्तत्र सुदु्र्लभ:
२५/८/२०१८©प्रभाकर पटवर्धन
pvpdada@gmail.com