Get it on Google Play
Download on the App Store

संपर्कात रहा

संपर्कात रहाण्यासाठी प्रयत्न करा

या लेखाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, मैत्री टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. प्रयत्न करण्याच्या इच्छेमुळे ओळखमात्र मित्रांपासून उत्कृष्ट मित्र वेगळे करता येतात. आपल्या मित्रांची विचारपूस करा. मैत्रीच्या प्रकारावर अवलंबून भेटण्याच्या वेळा ठरवा. दर काही दिवस किंवा आठवड्यातून एकदा भेटण्याची आवश्यकता नसेल तरी महिन्यातून एकदा भेटणे पुरेसे असते

शिवाय हे ई लक्षात ठेवा कि, आपण किती वारंवार भेटता त्यावरून आपल्या नात्याची सत्यता मोजली जात नाही. माझ्या काही चांगल्या मित्रांना मी काही महिन्यांतून एखादेवेळीच भेटतो काही तर इतके लांब आहेत कि भेटणे शक्य होत नाही. तरीही, आम्ही अगदी घट्ट मित्र-मैत्रिणी आहोत यात काहीच संशय नाही. शिवाय आमच्यातल्या कुणालाही कधी आमच्या मैत्रीची गरज भासल्यास आम्ही नेहमी मदतीस तत्पर असतो.

आपल्या मित्र-मैत्रिणींमध्ये प्रत्येकाचे आयुशाय्त वेगवेगळे प्राधान्यक्रम असू शकतात. प्रत्येकाचा वेळ कुठेतरी गुंतवलेला असतो. प्रत्येकाचे वेळापत्रक ठरलेले असते. एकत्र वेळ काढणे कठीण होऊ शकते. साध्या भेटीची व्यवस्था करा, दुपारचे जेवण, चहा किंवा रात्रीच्या जेवणाच्या वेळे भेट ठरवा. आपण नेहमी एखादा संदेश, ऑनलाइन चॅट किंवा फोन कॉल भेटू शकता. तंत्रज्ञानाने हे सगळे इतके सोपे झाले आहे की संपर्कात न राहणे आजच्या काळात जरा  कठीण आहे.

मला आशा आहे की या टिपा तुम्हाला उपयुक्त ठरल्या असतील.

मग आपण तयार आहात ना नवीन मित्र-मैत्रिणींशी मैत्री करायला??