Get it on Google Play
Download on the App Store

चाकोरीतून बाहेर काढा

स्वत:ला आपल्या चाकोरीतून बाहेर काढा

एकदा आपण आपल्या मित्रांच्या वर्तुळात पुन्हा भेटलात कि पुढील पायरी म्हणजे आपल्या ओळखीच्या नसलेल्या लोकांना भेटणे.

मीटअप.कॉम सारख्या ग्रुपमध्ये सामील व्हा. मीटअप.कॉम हे एक उत्तम सोशल नेटवर्किंग साइट आहे. बरेच इतरही ग्रुप ही आहेत, जसे की उद्योजकांचे ग्रुप, इच्छुक लेखकांचे, शाकाहारी, बोर्ड-गेम प्रेमी, सायकलिंग उत्साही, झाडं-झुडूपे प्रेमी  इ. आपले ज्या विषयात सरस्य असेल असं विषय किंवा ग्रुप निवडा.त्यात सामील व्हा.

अश्या ग्रुप मध्ये कधी कधी भेटी गाठीही होतात त्या प्रत्येक ग्रुपच्या लोकांवर आणि ग्रुपच्या विषयावर अवलंबून असते. बऱ्याच नवीन लोकांना त्वरित भेटण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.

कार्यशाळा/अभ्यासक्रमांना उपस्थित रहा. अशा कार्यशाळा/अभ्यासक्रमा मध्ये सारखी विचारधारा असलेले लोक एकत्रितपणे उपस्थित राहतात. मी गेल्या वर्षी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत गेलो होतो. त्या दरम्यान मी बऱ्याच महान व्यक्तींना भेटलो, ज्यांपैकी काहीजण माझे चांगले मित्र झाले आहेत.

 श्रमदान.एका दगडाने दोन पक्षी मारण्याचा उत्तम मार्ग म्हणजे केवळ दयाळूपणे आणि केवळ आपले सामाजिक कर्तव्य म्हणून नव्हे तर आपण यानिमित्ताने दयाळू आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांना भेटता.

समारंभ. समारंभांना हजेरी लावा. वाढदिवस पार्टी, ख्रिसमस / नवीन वर्षाचे स्वागत समारंभ, गृप्रवेश, वस्तूपूजा, बारशी, लग्न सोहळे, इतर समारंभ इत्यादी कदाचित आपणास नवीन मित्र बनवण्याची एक जागा मिळवून देईल. परंतु हे दर्जेदार नातेसंबंध असतीलच असे नाही. तरीही अधिक लोकांना भेटण्याचा चांगला मार्ग. त्यामुळे तुमचा लोकांशी बोलायचा सराव होईल.

बार आणि क्लब यांना भेट द्या. बरेच लोक मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्याही मित्रांना अश्या ठिकाणी भेटतात. मी याचा सल्ला तुम्हाला देणार नाही कारण या ठिकाणी झालेले मित्र-मैत्रिणी हे ओळखमात्र किंवा दुसऱ्या प्रकारचे असतील. बहुतेक वेळी अश्या ठिकाणी खऱ्या मित्रांऐवजी ओळखमात्र मित्र-मैत्रिणीच जास्त असतील.

आपण त्यांच्याबरोबर मैत्रीचे काहीही निर्णय घेण्यापूर्वी अश्या ठिकाणी त्यांना भेटून ते आपल्यासाठी त्यांची मैत्री कितपत योग्य आहे हे पाहणे चांगले होईल. मी शक्यतो अश्या ठिकाणी मित्र बनवत नाही. त्यांना दुसऱ्या दिवशी आपण आदल्या दिवशी काय केले हे लक्षात राहत नाही. पण ही जागा आपल्याला एक चांगला समीक्षक बनवू शकते आपण बऱ्याच लोकांचे निरीक्षण करू शकता.

ऑनलाईन समुदाय नवीन लोकांना भेटण्याचा इंटरनेट हा एक चांगला मार्ग आहे. माझ्या काही मैत्रींची सुरुवात ऑनलाइन झाली होती. मी १२ वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राला भेटलो. माझे ऑनलाइन मित्रांमधले मला माहित असलेले  दोन चांगले मित्र आहेत. त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा भेटलो आणि कालांतराने चांगले मित्रही झालो. आजही मी कधीही न भेटलेल्या लोकांशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत म्हणजेच इतर व्यक्तिमत्व विकास ब्लॉगर्स आणि माझे वाचक यात येतात. आपण भेटलो नाही याचा अर्थ असा नाही की आपण चांगले मित्र होऊ शकत नाही.

आजकाल, ऑनलाइन मंच हे एकत्र येण्याचे चांगले साधन आहे. हे मध्यवर्ती ठिकाणी आहे. आपले स्वारस्य असलेल्या विषयांबद्दलचे ऑनलाइन मंच पहा. त्यांच्या चर्चा आणि संभाषणामध्ये मुक्तपणे भाग घ्या आणि चर्चेला महत्त्व द्या. लवकरच, आपण तेथील लोकांना चांगल्या प्रकारे ओळखु शकाल आणि आपला गोतावळा वाढवू शकाल.