लहान संभाषणं
लहान-लहान संभाषणांनी सुरुवात करा.
जर आपण समाजात किंवा आजूबाजूंच्या लोकांत मिसळत नसाल तर नवीन लोकांचा समूह मोठ्या संख्येने समोर पहिला किंवा भेटलात तर घाबरू शकता. तसे असल्यास, प्रथम लहान संभाषणाने सुरुवात करा. ह्याची सुरुवात घरातून किंवा आपल्या जवळच्या लोकांपासून केली तर पुढे जाऊन अडचण कमी होते. ही अडचण कमी करण्याचे काही मार्ग खाली दिले आहेत.
आपल्या परिचितांपासून सुरुवात करा: तुमच्या आधीच्या आयुष्यात काही ओळखमात्र मित्र-मैत्रीणी आहेत का?? किंवा तुम्ही तुमच्या जुन्या मित्र-मैत्रीणच्या संपर्कातून लांब गेला आहात का?? त्यावर उपाय म्हणून एक साधासा एस.एम.एस. तयार करा आणि त्यांना “हाय” म्हणा..! त्यांच्या सुट्टीच्या किंवा मोकळ्या वेळात भेटण्याचे विचारा. पुन्हा त्यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी चांगली संधी आहे का पहा..! त्या अनुषंगाने पुढे वाटचाल करा.
व्हॉसअप ग्रुप पहा: आपण सामील होऊ शकाल असे काही व्हॉसअप ग्रुप पहा. तुमच्या शाळा कॉलेज नोकरीचे ठिकाण यांचे ग्रुप्स असतील त्यात सामील व्हा. ही कल्पना नवीन मित्रांच्या सभोवताली संभाषणाचा सराव करण्याची कल्पना आहे. व्हॉसअप ग्रुप असल्याने त्यातले सदस्य संभाषणांमध्ये किंवा चर्चेमध्ये कदाचित पुढाकार घेतील. जेणेकरून आपण केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकता आणि इतर लोकांमधील चर्चेतील गतिशीलता पाहू शकता.
आपल्या मित्रांच्या मित्रांना जाणून घ्या: आपण त्यांच्या घराबाहेर सामील होऊ शकता किंवा फक्त आपल्या मित्राशी त्यांची ओळख करुन घ्या. आपण आपल्या मित्रांसह सोयीस्कर असल्यास, त्यांच्या मित्रांसह आपणही आरामदायक असाल अशी एक चांगली संधी आहे.
बाहेर जाण्याची आमंत्रणे स्वीकारा: माझे काही मित्र आहेत जे क्वचितच बाहेर जातात. जेव्हा त्यांना आम्ही विचारतो तेव्हा त्यातले बहुतेक जण आमंत्रणे नाकारतात. ते बाहेर फिरण्याऐवजी घरीच असतात. परिणामी, त्यांचा मित्र-मैत्रिणी यांचा गोतावळा मर्यादित असतो. जर तुम्हाला अधिक मित्र-मैत्रिणी हवे असतील तर तुम्हाला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडावे लागेल. बऱ्याचदा बाहेर जावे लागेल. आपण घरी राहिल्यास वास्तविक जीवनात आपण अधिक मित्र बनवू शकत नाही..!