हास्यफुल
रभाते सारी फुले उमलती,
संध्येला बहू गळुनी पडती.
फुल हे माझे एकच असे
संध्येला पण गळत नसे.
रजनीच्या ते कुशीत वसे,
प्रतिदिन प्रभाती फुलत असे.
फुलास माझ्या एकच ठावे,
सदा सर्वदा हसत रहावे.
फुल हे कोमल आणि चंचल,
चोहीकडे ते बरसे परीमलं.