मन
मन माणसा कसे असावे,
निर्मळ शुद्ध जलासम ते असावे.
निर्मळ शुध्द जळातुनी जसे,
तळ तळ्याचे गडद दिसे.
तयासारखे, आत प्रतिबिंब वसावे.
इतरांना ते गर्द दिसावे.
मन माणसा कसे नसावे, गढूळ पाण्यासम ते नसावे.
गढूळ- गर्द पाण्यातून जसे,
तळ तळ्याचे कुणा न गवसे.
म्हणोनी धोंडे काटे तळाचे,
इतरांना ते पिडा बोचे.