Get it on Google Play
Download on the App Store

आरंभ

मदर रडारने विशालला मुक्त केले. प्रोफेसर, पूजा आणि विशालचे तिने आभार मानले. विशालची माफी सुद्धा मागितली. नंतर तिने आपला उजवा हात वर केला आणि त्यातून प्लास्टिक बीम बाहेर पडली आता सगळ्या सायलोज लहान होऊन  मदर सायलोमध्ये समाविष्ट झाल्या होत्या. पुन्हा तिने आणखी एक प्लास्टिक बीम सोडली आणि मदर सायलो खूपच लहान झाली. तिने सायलो स्पेसशिप मध्ये घेतली. तिने सगळ्यांचे पुन्हा आभार मानले आणि स्पेसशिपने जमा केलेल्या प्लास्टिकसह आंतराळाकडे प्रस्थान केले. ५०० वर्षानंतर एका भयानक महामारीतून त्यांची सुटका झाली होती. आणि पृथ्वीवरील प्लास्टिक कचऱ्याची समस्या सुद्धा तात्पुरती आटोक्यात येणार होती.

त्यानंतर विशाल, पूजा आणि प्रोफेसर तिघे अंकायाजवळ आले.

विशाल : “हा काय प्रकार आहे सगळा? हा माणूस खूपच डेंजर आहे. तू याच्या नादी लागू नकोस, पूजा!” 

प्रोफेसर : “मला माहित्ये कि तू खूप भांबावली आहेस. पण हे तुझ्यासाठी नवीन नाही. हे सगळं तू अनेक वेळा अनुभवलं आहेस. तुला काही आठवतय का?”

पूजा : “ नाही मला खरच काहीच कळत नाहीये. विशाल, माझी आई सगळ्यांवर माझं खूप प्रेम आहे. यांच्यावर संकट आलं तर मी सहन नाही करू शकत.”

प्रोफेसर : “ तू माझ्या बरोबर आलीस तर आवडेल मला.”

विशाल : “ पूजा याच्या नादी लागू नकोस, हा एलियन आहे”

प्रोफेसर : “हो मी एलियन आहे आणि अंकायासुद्धा...! आम्ही अवकाशात फिरत असतो.”

पूजा : “नाही खरच नको.”

प्रोफेसर : “ठीक आहे तुझी इच्छा. पण अजून एक सांगायचं राहिलं कि अंकाया म्हणजे अंतराळ काळ यान आहे. अर्थातच फक्त अवकाशात नाही तर अंकायाच्या सहाय्याने भूतकाळ किंवा भविष्यात सुद्धा प्रवास करू शकतो.  TIME TRAVEL!”

पूजा   : “TIME TRAVEL?  ते इंग्लिश मुव्ही सारखं ?”

प्रोफेसर  : “हम्म...”

पूजाने मग विशालला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली..

पूजा : “आय लव्ह यु विशाल! लग्नासाठी माझी वाट बघशील ना?”

विशाल : “काय?”

पूजा  : “आईला सांग मी लवकर परत येईन. बाय..!”

असं म्हणून ती धावत-धावत प्रोफेसरच्या मागे अंकायामध्ये शिरली. अंकाया सुरु झाला. २०-२५ मीटर ट्रक पुढे गेला. ड्रायव्हर सीटवर कोणीच नव्हतं. विशाल डोळे विस्फारून पाहत होता. त्याला काही समजायच्या आतच अंकाया दिसेनासा झाला. पूजाच्या अंतराळ काळ यानातील  प्रवासाचा आरंभ झाला होता.

क्रमशः