Get it on Google Play
Download on the App Store

मर्लिन रेसी शेपर्ड

मार्लिन रेसी शेपर्ड हिचा खून ४ जुलै १९५४ रोजी झाला होता. तिचे मृत शरीर तिच्या ओहायो मधल्या बे विलेजमध्ये सापडले. मार्लिनच्या हत्येच्या वेळी ती गरोदर होती. मार्लिनचा पती सॅम याने पोलिसांना आपल्या जबाबात सांगितले कि त्यावर एका माणसाने हल्ला केला होता. त्या माणसाचे केस दाट होते. त्या माणसाने  सॅमवर दोनदा हल्ला केला आणि त्याला बेशुद्ध केले होते. हे सगळे घडत असताना मार्लिन आणि सॅम यांचा मुलगा शेजारच्याच खोलीत शांतपणे झोपला होता. या सगळ्या प्रकारामुळे वास्तविक त्याची झोपमोड होणे साहजिकच होते, परंतु त्याला काहीच आवाज ऐकू गेले नाहीत. साधारण १९५४च्या वर्षात त्याला मार्लींच्या खुनासाठी अटक करण्यात आली. त्याच्या केसला बरीच पब्लिसिटी मिळाली. या केसची तुलना त्या वर्षाच्या जत्रेशी करण्यात आली. त्या जत्रेला जितकी माणसे आणि प्रसारमाध्यमे आली होती त्यापेक्षा जास्त सॅमच्या केससाठी त्यांनी रस घेतला होता.

सॅमनेच आपल्या गर्भवती बायकोची हत्या केली आहे असे प्रसारमाध्यम आणि ज्युरी यांनी पक्के केले होते. त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यावर त्याला दहा वर्षाच्या तुरुंगवासासाठी पाठवण्यात आले. १५ जुलै १९६४ रोजी त्याला कोर्टाकडून समन्स देण्यात आला. त्याने खटल्याची योग्य प्रक्रिया नाकारली आणि बऱ्याच खटाटोपानंतर त्याला तुरूंगातून सोडण्यात आले.

8 सप्टेंबर,१९६६ रोजी सॅमच्या परवानगीने त्यावर खटला सुरु झाला. सॅमने आपण “आरोपी नसल्याचे” सांगितले आणि त्याच वर्षी न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले.

या केसवर आधारित पुढे “ द फुजीटीव” हा चित्रपट आला.

त्यानंतर त्याने आपली पैलवानकी चालू ठेवली तो त्यात फार नाव कमवू शकला नाही.  त्याच्या पैलवानकीच्या छोट्या कारकिर्दीत त्याने आपले टोपणनाव  “द किलर” असेही ठेवले होते.

जो अनेक वर्षे त्यानेच आपल्या गर्भवती बायकोला मारले आहे हा शिक्का घेऊन जगला. परंतू, पुराव्याअभावी हि केसही उलगडली गेली नाही.