द केस ऑफ जॉन बेनेट रॅमसे
द केस ऑफ जॉन बेनेट रॅमसे ही जरा इतर केसेस पेक्षा अलीकडच्याच काळाची आहे. ही केस एका बाल सौंदर्य स्पर्धेत स्पर्धक असणाऱ्या लहान मुलीची आहे. ही मुलगी आपल्याच घरात मृतावस्थेत सापडली. तिचे घर बोल्डर कोलोराडो येथे आहे. ही केस साधारण १९९६ सालची आहे. तिला मृत्यूने गवसणी घातली तेंव्हा ती अवघ्या सहा वर्षाची होती. तिचे मृत शरीर तिच्या घराच्या तळघरात सापडले.
ती “हरवली आहे” अशी तक्रार तिच्या घरच्यांनी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर फक्त आठच तासात तिचा मृतदेह तळघरात सापडला. तिचे शव सापडले तेंव्हा तिच्या डोक्याला मोठा मार बसला होता आणि कुणीतरी तिचा गळा दाबल्याचे व्रण तिच्या गळ्यावर स्पष्ट दिसत होते. तिच्या मृत्यूचे अनेक सिद्धांत तयार करण्यात आले.
त्यातलाच बहुचर्चित सिद्धांत म्हणजे तिच्या मृत्यूमध्ये तिच्या आईवडिलांची आणि भावाची प्रमुख भूमिका होती. तथापि, तिच्या कपड्यांवर सापडलेल्या डी.एन.ए. पुराव्यांवरून असे दिसून आले की त्यात त्यांचा सहभाग नव्हता. जुलै २००८ मध्ये, जॉन बेनेटचे आई-वडीळ तिच्या मृत्यूला जबाबदार आहेत या शंकेतून मोकळे झाले.
डिसेंबर २००३ मध्ये, जॉन बेनेट रॅमसेच्या कपड्यांवरील रक्तातील डी.एन.ए. गोळा केला आणि त्याची एक प्रोफाइल तयार करण्यात आली. ती माहिती एफ.बी.आय.मधील डी.एन.ए.च्या प्रणालीमध्ये साठवण्यात आली. आजपर्यंत, जॉन बेनेट रामसेच्या कपड्यांवरील डी.एन.ए. प्रोफाइलशी कोणतीही जुळणी झाली नाही. नंतर पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांच्या लक्षात काही तथ्ये आली.
त्यांना असे आढळले की जॉन बेनेट रामसेच्या मृत्यूच्या महिनाभराच्या कालावधीत त्या भागात १०० पेक्षा जास्त घरफोड्या झाल्या होत्या. तिच्या मृत्यूचे कारण त्यातलीच एखादी घरफोडी असू शकते असा अंदाज पोलिसांनी वर्तवला. साधारण २००६ च्या सुमारास जॉन मार्क कॅर नावाच्या बेनेटच्या माजी शिक्षिकाने तिच्या मृत्यूच्या वेळी स्वतः जॉन बेनेटबरोबर असल्याची कबुली दिली. पोलिसांच्या तपासात त्याचा डी.एन.ए. त्यांना मिळालेल्या डी.एन.ए. प्रोफाइलशी जुळत नव्हता आणि या प्रकरणात जॉन मार्क कॅर सामील असल्याचे कोणतेही आरोप त्यांना मिळाले नाहीत त्यामुळे पुराव्या अभावी त्यांनी त्याला निर्दोष मुक्त केले. तिच्या मृत्युनंतर तिचा मोठा भाऊ बरीच वर्षे गप्प होता असे तेथील लोकांचे निरीक्षण होते. पोलिसांच्या ही नजरेतून एक छोटीशी गोष्ट सुटली होती. तिला ज्या दोरीने आवळण्यात आले होते त्या दोरीच्य एका टोकाला तिचा भाऊ पॅट्सी याचे रंगाचे ब्रश सापडले होते. पोलिसांनी तेंव्हा पॅट्सी लहान असल्याने त्याचा डी.एन.ए. तपसलाच नव्हता. त्यामुळे ही केसही अनिर्णायक राहिली. काहिंचे असे दावे आहेत कि तिचा खुन तिच्या मोठ्या भावाने ईर्षेपोटी केला असावा.