Get it on Google Play
Download on the App Store

लेक बॉडम मर्डर्स

५ जून १९६० रोजी फिनलँडमधील बॉडम लेक येथे तीन किशोरवयीन मुलांची हत्या करण्यात आली होती. ५ जून १९६०, पहाटेच्या सुमारास चार ते सहा या सुमारास चार किशोरवयींनी तलावाच्या किनाऱ्यावर तळ ठोकला होता. ते तिथे कॅम्पिंग करण्यासाठी आले होते. तेंव्हा अचानक काही अज्ञात इसमांनी त्या चौघांवर चाकू कि काहीसे बोथट शस्त्र घेऊन  हल्ला केला होता. या चौघांपैकी तिघे जण त्या हत्याकांडात मरण पावले तर एक तरूण  जिवंत वाचला. जो या सगळ्यातून वाचला त्याचे नाव निल्स् विल्हेल्म गुस्ताफसन. गुस्ताफसन २००४ पर्यंत आपले आयुष्य नेहमीप्रमाणे जगत होता. पण एके दिवशी तो हत्येच्या तपासाचा महत्वाचा धागा बनला. गुस्ताफसनवर खुनाचा आरोप करण्यात आला होता पण ऑक्टोबर २००५ मध्ये जिल्हासत्र न्यायालयाने त्याला निर्दोष मुक्त केले. मृत्यूच्या वेळी तीन बळींपैकी दोन जण फक्त पंधरा वर्षाचे होते. तिसरा १८ वर्षाचा म्हणजेच गुस्ताफसनचा समवयस्क होता. गुस्ताफसनला मेंदूला झालेली इजा झाली होती तसेच, जबडा आणि चेहऱ्यावर फ्रॅक्चर होते शिवाय त्याला बर्‍याच लहान-मोठ्या जखमांचा सामना करावा लागला होता.

बॉडम लेकच्या हत्या प्रकरणानंतर पाउली लुओमासह अनेक संशयित पोलिसांच्या रडारवर होते.पाउली लुओमा हा एक लबाड होता, तो आपल्या कामाच्या ठिकाणाहून अनेक घोटाळे करून पळून आला होता. नंतर त्याला निर्दोष मुक्त करण्यात आले कारण तो खुनाच्या वेळी इतर कुठेतरी हजर होता. याचा पाठपुरावा झाल्यावर त्याला सोडण्यात आले. या गुन्ह्यासाठी पेंटी सोयनिनही संशयित होता. सोनिनने यापूर्वीही अनेक हिंसक गुन्हे केले होते. तसेच मालमत्तेसाठी केलेल्या गुन्ह्यांच्या दोषांसाठी त्याला तुरुंगात धडले होते.

शिवाय त्याच्यावर, असा आरोप होता की तुरूंगात असताना त्याने खून केले होते. त्याने हे कबूलही केले होते. सोनिनेंच्या अपराधाबद्दल संशयाचे प्रमाण बरेच होते पण १९६९ मध्ये त्याने कैद्यांच्या परिवहन स्टेशनवर स्वत: ला फाशी दिल्यामुळे सत्य कधीच कळू शकले नाही. लेक बॉडम हत्येतील वाल्डेमार गिलस्ट्रॉम हा आणखी एक प्रमुख संशयित व्यक्ती होता. गिलस्ट्रॉम हा एका फोनसाठी उभारलेल्या खोपट्यात काम करायचा. तो ओट्टाचा रहिवासी होता. तो त्याच्या आक्रमक वर्तनासाठी परिचित होता.१९६९ साली त्याच बॉडम तलावामध्ये गिलस्ट्रॉम बुडून मृत्यू झाला. मरण्याआधी त्याने हत्येची कबुली दिली होती. गिलस्ट्रॉमबद्दल काहीच पुरावे सापडले नाही. त्याच्या पत्नीने त्याच्या वकिलाकडे हा गुन्हा खोटा आहे हे मान्य केले. तिच्या नवऱ्याने त्या दिवशीच्या हत्येच्या रात्री त्याच्या अनुपस्थितीबद्दल सत्य सांगितले तर तिला ठार मारण्याची धमकी त्याने त्याच रात्री तिला दिली होती. या हत्येप्रकरणी संशयितांपैकी कोणालाही दोषी ठरविण्यात आले नाही आणि हे प्रकरण न उलगडलेल्या खुनांच्या यादीत जाऊन बसले.