हिमालयी मित्रराष्ट्र ट्रेन
नेपाळ आणि भारत हे एकाच हिमालयाच्या कुशीत वसलेले दोन देश आहेत. नेपाळ आणि भारतामध्ये आता ट्रेन जोडली जाणार आहे. त्यामुळे भारत आणि नेपाळच्या परिवहन आणि पर्यटनाला एक मोठा टेकू मिळणार आहे. हा प्रकल्प संपूर्णपणे भारत सरकारच्या राजकोषातून होत आहे. या ट्रेनचा पहिला टप्पा मधुबानीतील जयानगर ते बिहारमधील कुर्था याने जोडला जाणार आहे. या वर्षाच्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत नेपाळ हीच रेल्वेलाईन बिजलपुर पर्यंत वाढवणार होती. भारत सरकारने या प्रकल्पासाठी आजपर्यंत ५५० कोटी खर्च केला आहे. तरीही अजून नेपाळ मध्ये 17 किलोमीटर लांब रेल्वेलाईन जोडायचे काम बाकी राहिले आहे. नेपाळ सरकार जेव्हा ट्रेनच्या कामासाठी जमीन देईल तेव्हा याच ट्रेनचे पुढचे काम चालू होईल असा अंदाज आहे.