मैत्री एक्सप्रेस
मैत्री एक्सप्रेस हि भारत आणि बांग्लादेशाच्या मैत्रीचे प्रतिक आहे. बरेच बंगाली भारतीयांचे नातेवाईक भारताप्रमाणेच बांग्लादेशातही राहतात. बंगाली भारतीयांना त्यांच्या अतेवैकांना भेटता यावे म्हणून भारत सरकारने मैत्री एक्सप्रेस चालू केली होती. यामुळे भारत आणि बांगलादेशाचे संबंध सुधारण्यास मदत झाली असा अंदाज आहे. या दोन देशांना जोडणारी ही पहिली आणि एकमेव ट्रेन आहे. ही ट्रेन भारतात आणि बांग्लादेशात प्रत्येकी एका ठिकाणी थांबते. भारतामध्ये मैत्री एकसप्रेसचे थांबण्याचे ठिकाण गेडे आहे. बांग्लादेशात ही ट्रेन दर्शना या ठिकाणी थांबते. ट्रेन इथे थांबली कि प्रवासांच्या ओळखपत्रांची पडताळणी होते. पासपोर्ट, आधारकार्ड यांची शहानिशा होते. ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस चालवली जाते. ही ट्रेन चालू ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न भारत आणि बांग्लादेशातील सरकार आपापल्या परीने करत आहेत. या प्रयत्नांना १४ एप्रिल २०२१ साली तेरा वर्ष बिनदिक्कत पूर्ण झाली आहेत.