द फेरी क्वीन
द फेरी क्वीन हि ट्रेन इस्ट इंडिया रेल्वे यानावाने ओळखली जायची. हि ट्रेन सन १८५५ ला ब्रिटीशांच्या काळात चालू केली होती. याची निर्मिती कीटसन, थॉम्पसन आणि हेविटसन यांनी केली होती. या ट्रेनची पुर्नरचना चेन्नई येथील लोको वर्क्स पेराम्बुर यांनी १९९७ साली केली. हि ट्रेन कधी कधी दिल्ली आणि अलवर या स्थानकां दरम्यान चालवली जात असे. आता ती ट्रेन रेव्री रेल्वे हेरीटेज म्युझियम मध्ये आहे. १९९८ साली या ट्रेनची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सर्वात जुनी वाफेवर चालणारी ट्रेन म्हणून नोंद करण्यात आली आहे. त्याचा वेग ४० किमी प्रती तास इतका होता. हि ट्रेन त्यावेळी तीन हजार लिटर पाणी वागवू शकत असे. ह्या ट्रेनला माजी प्रधानमंत्री माननीय अटलबिहारी वाजपयीजी यांनी राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार दिला.