Get it on Google Play
Download on the App Store

छत्रपती भोसलेंचे राजघराणे

जर तुम्ही महाराष्ट्रात रहात असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांच्याबद्दल माहीती असेल. या सगळ्या राजघराण्यांपैकी हे घराणे खुपच विखुरलेले आहे.  स्वराज्यस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आता सातारा, कोल्हापुर, नागपुर, मुधोळ, सावंतवाडी आणि तंजोर येथे राहतात. महाराजांच्या आठ पत्नी असल्याने हे घराणे विखुरले गेले आहेत. यामध्ये उदयनराजे भोसले हे स्वतः तेरावे छत्रपती असल्याचा दावा करतात. ते एक सक्रिय राजकारणी आहेत. आधी ते राष्ट्रावादी काँग्रेसच्या पक्षात होते. आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आहेत. यावेळी त्यांनी १७० करोडची मालमत्ता असल्याचे घोषित केले. त्यात पाच गाड्या आणि काही दागदागिन्यांचा समावेश आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे अजुन एक वंशज कोल्हापुरचे संभाजीराजे  हे ही आपण तेरावे छत्रपती असल्याचा दावा करतात. ते सध्या राज्यसभेचे सदस्य आहेत. ते भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत.