Get it on Google Play
Download on the App Store

मेवाडचे राजघराणे

प्रचंड संपन्न वैभव पाहिलेले मेवाडचे साम्राज्य म्हणजे महान महाराज महाराणा प्रताप यांचे घराणे आहे. आज महाराणा प्रताप यांचे वंशज उदयपुर येथे राहातात. आता या घराण्याचे प्रमुख राजासाहेब अरविंदसिंग मेवाड आहेत. ते ह्या मेवाडच्या घराण्यातले पंच्याहत्तरावे वंशज आहेत. नाममात्र राजा असुनही अरविंदसिंग हे एक यशस्वी व्यवसायिक आहेत. ते एच. आर. एच. ग्रुप ऑफ हॉटेलस् याचे प्रमुख आहेत. या कंपनीच्या नावाखाली दहा हॉटेलस् आहेत.

महाराज अरविंदसिंग मेवाड आणि त्यांची पत्नी महाराणी विजयाराज हे त्यांच्या पुर्वाजांच्या महालात उदयपुर येथे रहातात. या महालाचा काही भाग पर्यटकांसाठी खुला केला आहे. त्यांचा महाल आणि त्यांचा वारसा याची ओळख करुन घेण्यासाठी तिथे पर्यटक गाईड आहेत. महाराजा अरविंदसिंग यांनी आपले काही महाल भाडे तत्वावर दिले आहेत. यातले लेक पॅलेस आणि फतेह प्रकाश पॅलेस हे महाल त्यांनी ताज ग्रुप ऑफ हॉटेलस् यांना सांभाळण्यासाठी भाडेतत्त्वावर दिले आहेत. त्यांना ट्रॅव्हल आणि टुरिझम या क्षेत्रातील सर्वात संपन्न व्यक्ती म्हणुन वाखाणण्यात आले आहे.

महाराजा अरविंदसिंग यांनी मेवाड किंवा उदयपुर मधील जुन्याकाळातील चारचाकी गाड्यांचे संग्रहालय सुरु केले आहे. महाराजा अरविंदसिंग त्यांचा पुर्वापार समृद्ध वारसा असलेली काही बहुमुल्य रत्नेही जतन करुन ठेवलेली आहेत. मेवाड राजघराणे भारतातील श्रीमंत घराण्यांपैकी एक आहेत.