Get it on Google Play
Download on the App Store

विष्णु-पुराणातील कथा

हि कथा श्री विष्णुपुराणात सांगितलेली आहे. हनुमान जन्माची कथाही विष्णुपुराण आणि नारदिय पुराणात लिहिली आहे. नारदमुनींना एक राजकन्या आवडली होती. ते धावत भगवान श्रीविष्णुंकडे गेले. त्यांनी श्रीविष्णुंना आपल्याला 'हरी मुख' दयावे अशी मागणी केली. हरी मुख म्हणजे श्रीविष्णुंसारखे रुप. श्रीविष्णुंच्या रुपाने भाळुन राजकन्या नारदमुनींना स्वयंवरात वर म्हणुन निवडेल. श्रीविष्णुंनी हरिमुखाऐवजी त्याला वानरमुख बहाल केले. श्रीविष्णुंची ही मस्करी न जाणताच नारद स्वयंवरात पोहोचले. त्यांचा चेहरा पाहुन राजकन्येला हशा फुटला. त्यांचा चेहरा वानरासारखा चेहरा इतर सगळ्या राजपुत्रांच्या आधी तिने पाहिला आणि तिला हसुच आवरले नाही. नारदांना आपला अपमान सहनच झाला नाही. त्यांनी रागात श्रीविष्णुंना शाप दिला " हे प्रभु, आपणाला हे कृत्य शोभा देत नाही. एक दिवस असा येईल ज्यावेळी तुम्ही हतबल असाल आणि तुम्हाला एका वानराची मदत घ्यावी लागेल." 

श्रीविष्णुंनी स्मित केले आणि म्हणाले, "मुनिवर्य, मी जे काही केले ते आपल्या चांगल्यासाठी केले. असे केले नसते तर कालांतराने आपण आपल्याच शक्तिंवर शंका घेऊ लागला असता. आपला आत्मविश्वास खचला असता. मी आपणाला तेच बहाल केले जे आपण मागितले. हरीचा संस्कृतमध्ये दुसरा अर्थ वानर असाही होतो."

हे एकुन नारदमुनींना आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला. श्रीविष्णुंनी नारदमुनींना पश्चाताप न करण्यास सांगितले. त्यांची जो शाप दिला होता तो खरतर एक वरदानच ठरणार होता. त्यामुळे हनुमानाचा म्हणजेच एका रुद्रावताराचा जन्म झाला होता. ज्याच्या मदतीशिवाय प्रभु श्रीराम रावणाचा वध करु शकले नसते.