दुर्योधनाचा पेचप्रसंग
मृत्युशैय्या
भीमाने आपली गदा जोरात फिरवली आणि दुर्योधनाच्या जांघांवर प्रखर वार केला. दुर्योधन कळवळला. त्याच्या जांघेतून रक्त भळभळा वाहू लागले. त्याने उठण्याचा प्रयत्न केला परंतु तो कोसळला. भीमाने त्याच्या छातीवर वार केला. त्याच्या छातीतून रक्त वाहू लागले. सूर्य अस्ताला जात होता. क्षितिजावर लाल किरण विखुरले होते. एका बाजूला युद्ध चालू होते आणि दुसरी कडे एक रथ दुर्योधनाच्या जवळ येत होता. इतक्या वर्षात जे घडले नव्हते ते आज होणार होते. स्वतः द्रौपदी युद्धभूमीत आली होती. ती रथातून खाली उतरली. भीमाने दुर्योधनाच्या चाहतीतून वाहत असलेले रक्त एक असोण्याच्या वाटीत घेतले. द्रौपदी युद्धभूमीत पद्मासनात बसली. भीमाने दुर्योधनाच्या रक्ताने तिचा अभिषेक केला. हे दृश्य इतरांसाठी भयावह होते. द्रौपदीच्या केसां पडणारे लाल रक्त तिच्या शुभ्र तनु वरून खाली ओघळत होते. तिच्या डोळ्यात आज इतक्या वर्षांनी समाधान दिसात होते. तिच्या अपमानाचा सूड आज पूर्ण झाला होता. ती युद्धाभूमितून निघून गेली. दुर्योधनाने कृष्णाला जवळ बोलावले. कृष्णाने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले. “हे दुर्योधना, मी सर्वज्ञानी आहे. तुझ्या मनात विचारांची जी गलबते उठली आहेत त्यांच्यावर माझ्याकडे उत्तर आहे.”
दुर्योधनाची प्रश्नावली
कृष्ण दुर्योधनाच्या डोळ्यात पाहत होता. त्याने त्याच्या मनातले प्रश्न जाणले.
हस्तिनापूरच्या बाजूने तटबंदी का बंधली नाही?.
गुरु द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर अश्वथामाला सेनापती का नाही बनवले?
विदुराला युद्ध लढण्यासाठी पटवून का दिले नाही?
दुर्योधनाचे समाधान
“दुर्योधना, मी तुझ्या मनाची होणारी चलबिचल ओळखली आहे. तुझे काही प्रश्नहि हेरले आहेत. त्याची उत्तरे मी नक्कीच देईन. प्रथम हस्तिनापूरच्या बाजूने तटबंदी केली असती तर मी नकुलाला सांगून ती तटबंदी तोडून घेतली असती. नकुलाकडे अशी शक्ती होती ज्याने तो मुसळधार पावसाच्या मध्ये दोन थेंबांमधून जाऊ शकत होता. त्याने तटबंदी तोडली असती.” दुर्योधनाने समाधानाने मान डोलावली. “गुरु द्रोणाचार्या नंतर अश्वथामा जर सेनापती झाला असता तर मी युद्धीष्ठीराला क्रोधीत केले असते. युद्धीष्ठीर हा धर्मपुत्र आहे म्हणजेच यमपुत्र आहे. त्याला राग आला तर त्याच्या नजरेच्या टप्प्यातील सारेकाही जाळून बेचिराख झाले असते.” दुर्योधनाचा आता फक्त शेवटचा प्रश्न राहिला होता ज्याचे उत्तर श्रीकृष्ण देणार होता. “दुर्योधना तू जर विदुराला युद्धभूमीत उतरवले असतेस तर मी स्वतः पांडवांच्या बाजूने लढलो असतो.” दुर्योधनाची नजर थोडी शंकित वाटली. तेंव्हा कृष्ण म्हणाला, “हा कुरुक्षेत्री होणारा संहार मला ठाऊक होता. परंतु मी कुणाच्या कर्माची फलश्रुती टाळू शकत नाही. म्हणून मी हा संहार कमी करण्यासाठी तुला आत्ता सांगितलेल्या गोष्टी टाळल्या. दुर्योधनाने समाधानाने डोळे मिटले.