सहदेवाच्या बुद्धीचे रहस्य
सहदेव हा पांडवां मधील एक अत्यंत सर्वज्ञानी आणि सद्सदविवेक बुद्धीने विचार करणारा होता. तो महाभारतातील एक अत्यंत महत्वाचा परंतु थोडा विस्मृतीत गेलेला पांडू पुत्र होता. याची कथा अशी सांगितली जाते . पांडू मृत्युशय्येवर असताना माद्रीच्या आणि कुंतीच्या समवेत होता. “राणी माद्री आणि राणी कुंती मी तुम्हा दोघींना या जटील परिस्थितीत आपल्या पाच मुलांसमवेत सोडून जात आहे. मी आपल्या मुलांना पुरेसे ज्ञानार्पण करू शकलो नाही. परंतु माझी एक इच्छा आहे. माझ्या मृत्युच्या पश्चात माझा मेंदू हा पाचही मुलांना समान वाटावा. त्यांना तो ग्रहण करण्यास सांगावे. यामुळे मी आजपर्यंत कमावलेली विद्या आणि ज्ञान त्यानं आत्मसात होईल.” त्याची हि विचित्र इच्छा पांडवांना सांगितली. तेंव्हा फक्त सहदेवने त्याचा वाटा ग्रहण केला. इतर पांडवानी प्रयत्न केले परंतु त्यांचे मन असे करण्यास धजावले नाही. “पुत्र सहदेव तू हे मांस ग्रहण केलेस तर राजा पांडू यांनी केलेले ज्ञानार्जन प्राप्त होईल.” कुंतीने बळ एकवटून सांगितले.
सहदेवाने धाडसाने पहिला घास घेतला. त्याने डोळे मिटले होते. त्याला सर्व विश्वाच्या भूतकाळाचे ज्ञान प्राप्त झाले. त्याने आपली शक्ती एकवटून दुसरा घास घेतला आणि क्षणार्धात त्याच्या समोरील काळाच्या पडद्यावर काही धुरकट प्रसंग दिसू लागले. त्याला विश्वाच्या वर्तमनाचे ज्ञान अवगत झाले. आता त्याचा आत्मविश्वास वाढला होता. त्याची चर्या तेजस्वी दिसू लागली होती. आता शेवटचा एक घास. आपण आपल्या पित्याचा मेंदू खातोय हि संकल्पना सहदेवाला रुचत नव्हती. परंतु न भूतो न भविष्याती अश्या ज्ञानार्जनासाठी हि किंमत खूपच क्षुल्लक होती. त्याने शेवटचा घास ग्रहण केला आणि त्या पर्णकुटीत तेजस्वी प्रकाश सर्वत्र पसरला. “ पुत्र सहदेव आता तुला भूत, भविष्य, वर्तमान, या काळाची सफर करता येईल आणि तेथे घडणाऱ्या घटना याची देही याची डोळा पाहता येतील. परंतु तू या घटना बदलू शकत नाहीत. या घटनांचे परिणाम कमी करणे हे तुझ्या हातात आहे. या ज्ञानाचा जपून वापर कर.” पांडूचा आवाज आला आणि सहदेवाला पांडूची आकृती दिसली. त्याने विनम्रतेने नमन केले आणि निरोप दिला. आपल्याला सर्वांची भविष्ये कळलेली आहेत. त्याला महाभारताच्या युद्धाचीही कल्पना होती. युद्धातील मृत्यु तरीही ते अटळ होते. आपल्याकडून कुणालाही हे कळू नयेत म्हणून त्याने महाभारताचे युद्ध आरंभ झाल्यापासून ते अंतपर्यंत मौन पाळले होते.
सहदेव हे महाभारतातील एक उपेक्षीत पात्र आहे. आज आपण एखाद्याचे डोके खातो म्हणजे त्या माणसाच्या मागे लागतो. कदाचित त्याकाळी त्याने पंडुच्या मागे लागुन त्यांच्याकडुन ज्ञानार्जान केले असेल. सहदेवाने पंडुला आपला वेळ दिला असेल. सहदेव आणि इतर पांडव राजघराण्यातील होते. राजघराण्यातील व्यक्ती असल्या बर्बर प्रथांचे आचरण करत असतील हि गोष्ट शब्दशः अतर्कीक वाटते. या उपर भारतामध्ये उपलब्ध असलेले लिखीत साहित्य कालौघात धर्मांध मुस्लिम राज्यकर्त्यांनी नष्ट केल्यामुळे तसेच लबाड पाश्चात्य राज्यकर्त्यांनी उपलब्ध साहित्याचा आपल्या सोयीने विपर्हयास करुन फोडा आणि राज्य करा या नितीने आपल्या पोळीवर तुप ओढुन घेण्यासाठी अनमोल भारतीय सनातन ज्ञानाची पायमल्ली केली. त्यामुळे सहदेवाने आपले पिता राजा पंडु यांचा मेंदु ज्ञानप्राप्तीसाठी भक्षण केला हे अविकसित, नव्या पाश्चात्त्य आणि आखाती धर्म प्रवाहांनुसार योग्य वाटत असेलही परंतु पवित्र , प्राचीन भारतीय सनातन संस्कृती आणि विचार प्रवाहांनुसार उथळंच वाटते.