युयुत्सु
महाभारतात अनेक नाती गुंतागुंतीची आहेत.द्रोणाचार्यांचा जन्म, शंभर कौरवांचा जन्म. हे सगळे जसे विचित्र आहे. तसेच युयुत्सुचा जन्महि आहे. गांधारी जेंव्हा गर्भवती होती तेंव्हा तिच्या राज्यातून एक दासी आली होती. हि दासी तिची सर्वतोपरी काळजी घेत असे. तिच्या सौंदर्याला धृतराष्ट्र भाळला. धृतराष्ट्र आणि त्या दासीच्या संबंधातून एका पुत्राचा जन्म झाला. तो राजपुत्र नव्हता परंतु धृतराष्ट्राचा मुलगा असल्याने त्याने युद्ध कौरवांच्या बाजुने लढला. त्याचे नाव “युयुस्तु”.