Get it on Google Play
Download on the App Store

लोकगीत - गीत नववे


 सारंग पाट डोंगरावरीं । तेथें खेळे भीमाशंकरी ।तिथं येवश्या आल्या सत्त्वरी । कळ रविलाची फारी ।पारवती म्हणे शिवा । डाव पैजेचा मांडावा ।डाव पहिला गीरजेचा । नंदी हीराऊनी घेतला ।सारंगपाट खेळली गिरजा । जिंतिलाचि शंभु राजा ।धरी शंकराच्या हाताला । जावा म्हणती वनवासाला ।शंकर क्रुध्दान दाटला । शंकर नीघून चालला ।मार्गी नारद भेटला । हकांगत नारदाला ।सारंगपाट खेळली गिरजा । जिंतिलाचि संभु राजा ।मला म्हणती वनवासाला जावा । नारद बोल वचनी ।आग लागो द्या खेळाला । द्यावी सोडून या गिरजाला ।तुम्ही जावं पाशी वनाला । धुनी घालुनी बसावा ।बारा न बारा वर्स झालीं । आठवण झाली गिरजाला ।आग लागो या खेळाला । धनी कैलासाला गेला ।कुणी येवशीन फितवुनी नेला । गिरीकंदरी जाऊन बसला ।मत्राचा घट केला । बेस भिल्लिणीचा घॆतला ।चोळी उरफटी अंगाला । बाणाचा भाता पाठीला ।हातीं तीरकमठा घेतला । चुन्याची टिकली गालाला ।निघाली शोधावयाला । रणवन शोधून जीव दमला ।हिमचाल पारवताला । गेली त्याच वनाला ।शंकर पाहिले दूरचे दूर । भिलणीचं हरसलं मन ।तिन शंकर देखला । धुनी घालून बैसला ।गेली शंकराचें हरपलें मन । करी भिलणीशीं भाषण । तूं हाईस कूणाची कोण ! वत्राची भिल्लीण अज्ञान ।मी आलें तुमच्या कारद्द्ण । शंकराचें हरसलें मन ।मांग म्होर नाहीं कोण । आपण होऊं ग गोसावी।शिवशंकर चैतान झाला । हात भिलणीवर टाकला ।सोड सोड झिंझाडा दिला । भिल्ल हायत साठ वनाला ।मारत्याल आपल्या दोघाला । हातांत घालून हात ।भिल्लीण करी भाषण । वाईट तुमचे गुण ।पारवतीसारखें रत्न । तुम्ही आलेत टाकूनशान ।दोघांचा मनोरथ पुरला । बेस भिल्लणीचा टाकला ।पारवती उभी शिवाला । निघून गेले कैलासाला ।