सायनाईड प्रकरण 2
न. तुझ्या अंदाजाने तुला योग्य वाटेल ते कर.”
‘ त्या टेप रेकॉर्डिंग चं काय करणार आहात तुम्ही ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले.
डॉ. डोंगरेहातात टेप रेकॉर्डर घेऊन दाराकडे निघाले.” माझ्या दृष्टीने फक्त पाच माणसांनीच हे रेकॉर्डिंग ऐकलय; तू,सौम्या सोहनी,माझी नर्स,अनन्या गुळवणी,आणि मी स्वतः “
पाणिनी पटवर्धन विचारात पडला. “ पाच माणसे म्हणजे खूप झाली. “
“ ही संख्या कशी कमी करता येईल? काही सुचतंय का ? “
पाणिनी पटवर्धन ने मान हलवली. “आता काही होण्यासारखे नाही. तुमची नर्स तिथे नसती तर बर झालं असत.”
“ मला ही आता तसं वाटतंय. पण केवळ बेशुद्ध अवस्थेतील रुग्णाला सांभाळण्यासाठी च नर्स लागते असं नाही तर भावनिक दृष्ट्या अस्वस्थ अशा तरुणीला,खोलीत नर्स मदतीला असल्याशिवाय तुम्ही औषधाच्या अमलाखाली आणू शकत नाही.,”
पाणिनी पटवर्धन ने मान डोलवली.
डॉ. डोंगरेम्हणाले, “ आपण उद्या नऊ तीस ला भेटू मग.” त्यांनी दारातून अच्छा केला.
सौम्या सोहनी ने पाणिनी पटवर्धन कडे पहिले. “ कनक ओजस हवाय? “
तो एक उत्कृष्ट असं खाजगी गुप्त हेर होता.पाणिनी पटवर्धन चा खास मित्र .पाणिनी पटवर्धन ची सर्व कामे तोच करायचा, त्याची स्वतःची डिटेक्टिव्ह फर्म होती. हाताखाली अनेक माणसे होती.
पाणिनी पटवर्धन ने मान हलवली “ त्याला फोन कर,तो लगेच इकडे येऊ शकतो का विचार .”कनक ओजस चं ऑफिस पाणिनी पटवर्धन च्याच मजल्यावर असल्याने सौम्या चा फोन आल्यावर काही मिनिटातच तो पाणिनी पटवर्धन च्या ऑफिसात हजर झाला.एका विशिष्ट पद्धतीने त्याने दारावर दार टक- टक केली. ती पद्धत पाहून कनक आल्याचे दोघानीही ओळखले.सौम्या ने दार उघडून त्याला आत घेतले. चांगला उंचपुरा असूनही कुणाच्या सहज नजरेत न भरण्याची कला त्याने आत्मसात केली होती.तो आत येऊन अशीलांसाठी ठेवलेल्या गुबगुबीत खुर्चीत तिरका बसला.खुर्चीच्या एका हातावर आपली पाठ टेकवली तर दुसऱ्या हातावर तंगड्या पसरल्या !
“ बोला महाशय ! “
पाणिनी पटवर्धन म्हणाला , “ माझ्याकडे नेहमीपेक्षा वेगळच प्रकरण आलंय. माझ्यासाठी माहिती काढायची आहे तुला. काळजीपूर्वक आणि सावकाश काम सुरु कराव लागेल.असा काही तपास केला जातोय हे कुणालाच कळता कामा नये. या प्रकरणात तुझ्यावर वेळेचे बंधन नाही.जरा निवांत पणेच हे सर्व करायचं आहे.”
ओजसने डोळे चोळले,कान ओढल्या सारखे केले.
“ काय झालं ? “ पाणिनी पटवर्धन ने विचारले.
“ स्वप्नात तर नाहीये ना मी ? “ ओजस उद्गारला. “ अत्तापर्यंतची तुझी पद्धत म्हणजे मला बोलवायचं अन् सांगायचं की माझ्याकडे एक प्रकरण आलंय जे मला तुझ्याकडून काही तासात किंवा मिनिटातचं पूर्ण करून हवंय. हा क्लिष्ट तपास पूर्ण करण्यासाठी कितीही माणसे कामाला लाव. मला उद्या सकाळ पर्यंत ते पूर्ण झालेलं दिसलं पाहिजे. आणि आता या प्रकरणात मात्र तू वेगळच काहीतरी बोलतो आहेस ! “
“ अगदी बरोबर ! पाणिनी पटवर्धन हसून म्हणाला.” तू नेहमी म्हणायचास ना की पुरेसा वेळ मिळाला आणि जास्त माणसे कामावर नेमली नाहीत तर तू जास्त चांगले काम करू शकतोस ! “
“ आता ऐक जरा नीट, मी म्हणालो होतो की आपण आर्थिक दृष्ट्या अधिक काटकसरीने काम करू शकतो.जेव्हा जास्त माणसे अधिक वेगात कामाला लावली जातात, तेव्हा कधीकधी त्याच कामाला दुप्पट श्रम खर्च होतात आणि मानसिक आणि शारीरिक ताण येतो.खर्चावरही बोजा पडतो. तू......”
“ माहित्ये मला.” पाणिनी पटवर्धन म्हणाला. “ या प्रकरणात तू जेवढे शक्य असेल तेवढे काटकसरीने पण सक्षम पणे काम करायचं आहेस. हर्षल मिरगल नावाच्या माणसाची पूर्ण पार्श्वभूमी खणून काढ.तो याच शहरात राहत होता.तीन महिन्यापूर्वी तो गेला. म्हणजे वारला.रक्ताच्या गुठळ्या झाल्याने मृत्यू असं कारण दिलय.त्याची मालमत्ता आहे का ? ,किती आहे?,कोणी त्याची मागणी केली आहे का? हे मला काही माहीत नाही पण मला ते सर्व हवंय.त्याच्या वारसांची नाव मला हव्येत.तो मेला तेव्हा त्याच्या बरोबर कोण होते, त्याने मृत्युपत्र केले होते का? केव्हा केले,त्याने विमा उतरवला होता का? ज्या डॉक्टर ने मृत्यू दाखल्यावर सही केल्ये त्याच्याशी तुला बोलावे लागेल.मृत्यू समयी काय लक्षण दिसत होती ते मला शोधून काढायच आहे.तू विमा कंपनीचा प्रतिनिधी आहेस असं भासवायला लागेल तुला “
“ छे, छे ! “ ओजस म्हणाला “ असले प्रकार आम्ही नेहमी करतो. बऱ्याच वेळी आम्ही विमा कंपनीचे प्रतिनिधी म्हणून काम करतो ”
“ मला वाटल त्यांचे स्वतःचे तपास करणारे अधिकारी असतात. “
“ असतात तसे, पण कधी कधी ते आम्हाला बोलावतात. “
“ ठीक आहे .” पाणिनी पटवर्धन म्हणाला.” सुरु कर तपासाला. सावकाश कर फार घाई नाहीये,ज्याला तू काटकसरीने व सक्षम पणे असं म्हणतोस , अशा पद्धतीने हे प्रकरण हाताळ.”
“ बरं, करुया तसच “ ओजस म्हणाला. आणि त्याने निरोप घेतला.
(भाग 2 समाप्त)