chapter 2 : ऍडमिशन (कॉलेज प्रवेश)
बुलढाणा जिल्ह्याच्या असणाऱ्या संत गजानन महाराज महाविद्यालयात मी प्रवेश घेतला. शेगाव हे गावं दोन गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पहिली गोष्ट म्हणजे महाराजांचं भव्य असं मंदिर आणि आनंदसगर जिथे असंख्य भक्तजन एक पुण्यभूमी म्हणून महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. खरंतर हे मंदिर स्वच्छतेचं प्रतिक मानलं जातं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संत गजानन कॉलेज ऑफ इंजिनीरिंगच. कॉलेज म्हटलं की एक वेगळं जग असतं, एक वेगळं विश्व असतं ज्यात स्वातंत्र आणि मनसोक्त मोकळेपणा जगायला मिळतो असे मला शाळेत असतांनाच वाटायचे. त्यामुळे मी तुम्हाला थोडं भूतकाळात घेऊन जाते. २०१४ ला बॅ. शेषराव वानखेडे शाळेतून मॅट्रिक पास झाल्यानंतर चांगल्या कॉलेजला जाण्याची माझी उत्सुकता जास्तच वाढली. माझं पहिलं कॉलेज ते पॉलिटेक्निकचं. पहिल्याच यादीत मला नागपूरचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज मिळालं. गव्हर्मेंट पॉलिटेक्निक कॉलेजची खासियत म्हणजे हे कॉलेज कुठेही असो नागपूर, अमरावती की वाशिम या कॉलेजच्या गेटचं बांधकाम मात्र सारखं. माझ्या जीवनातील कॉलेज प्रवास म्हणून असंख्य स्वप्न माझा डोळ्यात रंगली होती. फक्त स्वप्नात आनंददायी वाटणारा प्रवास आनंददायी नव्हताच. क्लासमध्ये फाडफाड इंग्रजीत बोलणारे आणि मी मात्र पहिले ते दहावी मराठीतून शिकलेली. त्यामुळे मला मनमोकळेपणाने वावरता येईना, कुणाशी मैत्री करता येईना. करिअर कडे लक्ष देत शेवटच्या वर्षाला 1st क्लास आली.
बाबांचे नेहमीचे शब्द मला आठवायचे 'हार पुढे जीत असते'. त्या बाबांच्या शब्दांवर मी अजूनही कायम होती. आपल्या स्वप्नांना डोळ्यात पुन्हा भरू लागली. मनाला दिलासा देऊ लागली मी पुन्हा माझा स्वप्नातल्या कॉलेजच्या शोधात होती. सिनेमात दाखवल्या जाणाऱ्या कॉलेज सारखं कॉलेज प्रत्येकाला हवं असतं तसं मलाही हवं होतं. ठरवलं आता डबक्यात राहुन चालणार नाही डबक्याच्या बाहेरही निघणं गरजेचं आहे. कॉलेजची लिस्ट बघणं सुरु होती. फॉर्म भरला इंजिनीरिंग कॉलेजसाठी, दोनच नावे टाकलीत एक गव्हर्नमेंट कॉलेज अमरावती आणि दुसरं शेगावचं संत गजानन कॉलेज. नंबर लागला तो महाराजांच्या कॉलेजमध्ये, घरचे सगळे खूप खुश होते, मीही खुश होती.
ऍडमिशनसाठी दुपारी नागपूरमधून निघणारी महाराष्ट्र एक्सप्रेसने आम्ही दोघंही(बाबा आणि मी) शेगावला निघालो. जनरलमध्ये बसल्याने जागेचा कमकरते सोबतच आवाजाचा गोंगाट त्रास देत होता. अनेक स्टेशन पार करत गाडी शेवटी शेगावला पोहोचली. महागडा ऑटो करून कॉलेजला पोहोचलो. गेटवरील चौकीदाराने आम्हाला थांबवलं आणि विचारलं,
'कश्यासाठी आलात?'
मी म्हटलं,'ऍडमिशनसाठी'
बाबांनी विचारलं,'ऍडमिशनचं ऑफिस कुठे आहे?'
त्यांनी इशारा करत सांगितलं. आता जाणारच तितक्यात त्यांनी विचारलं, 'कुठून आलात माउली तुम्ही, फार दमलात वाटतं!'
मी म्हटलं, 'नागपूर'
ते म्हणाले,'अच्छा, तुम्ही आधी बसा, मी पाणी आणतो.'
पाणी पिल्यानंतर कितीतरी वेळानंतर शरीराला 'energy dose' मिळल्यासारखा वाटला. ऑफिसकडे जाताना सगळं काही शांत-शांत वाटत होत मनात म्हटलं,'आज ऍडमिशन असूनही इतकं शांत कसं काय?', मग विचारांकडे दुर्लक्ष करत ऑफीसच्या दिशेने पावलांचा वेग वाढवला. अंदर ऑफिसमध्ये गेल्यावर आम्ही दोघांनीही गजानन महारांजच्या फोटोला वंदन केले. दुसरीकडे बघते तर काय ऍडमिशन हॉलला कुलूप लावलेलं होतं. बघून धक्काच बसला. मी लगेच तिथल्या एका सरांना विचारलं,'सर, हे बंद कसं काय आज तर ऍडमिशन होती न?'
ते म्हणाले,'हो पण ते सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत च होती'
मी विचारलं,'अच्छा सर आम्ही उदयाला आलो तर होईल ना'
ते म्हणाले,'आजचा शेवटचा दिवस आहे'
मी म्हटलं,'सर please आता होईल नाही का?'
ते म्हणाले तुम्ही प्रिन्सिपल सरांना विचारा, आम्ही लगेच गेलो सरांना विनवणी केली,
'सर खरच आम्ही खूप दुरून आलोय, सर please शक्य असेल तर करा ना '.
त्यांनी न रागवता होकार दिलेला बघून आमचा दोघांच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू आलं. आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद म्हटलं.
त्यांनी कर्मचाऱ्याला कुलूप उघडायला लावलं. आम्ही कॅश काउंटर वर पैसे जमा केलेत आणि काही महत्वाचे डॉक्यूमेन्ट सबमिट केलेत. अशाप्रकारे माझी ऍडमिशन प्रोसेस पूर्ण झाली. मनाला आनंदासोबत एक समाधानही मिळालं कारण ते कॉलेज माणसाची माणुसकी शिकवणारं होतं जे आजही क्वचितच पाहायला मिळतं...!!