सम्यक समाधी
सम्यक समाधी हा अंतिम टप्पा आहे. दैनंदिन जीवनात त्याचा अवलंब करणे कठीण आहे. दु:ख आणि षड्रिपूंच्या पलीकडे जात अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी सात्त्विक मार्गाने जगता जगता हळूहळू मनाची तयारी होऊन 'हर्ष खेद ते मावळले' अशी स्थिती आली की मन विशुद्ध आनंदाने भरून जाते. अंतर्यामीच्या या स्थितीला सम्यक समाधी म्हणता येईल.