Get it on Google Play
Download on the App Store

सम्यक वाणी

हे तिसरे सूत्र आहे, सम्यक वाणी. आपले बोलणे सत्य, सरळ आणि प्रिय असावे. खोटेपणा, ढोंग फसवणूक आपले अनेक तऱ्हांनी नुकसान करतात. आपल्या रोजच्या जगण्यात पुष्कळदा आपण आत काहीतरी दडवतो. एखाद्याबद्दल राग असताना बाहेर मात्र गोड गोड बोलतो. राग दडपल्यामुळे तो वेगळ्या प्रसंगी वेगळ्या मार्गाने बाहेर पडू शकतो. अशी माणसे अकारण हिंसक होऊ शकतात. विपरीत किंवा बदलून न सांगता जे आहे जसं आहे तसं सांगायला हवे . राजाचे हेर किंवा मंत्री खोटे आणि गोड बोलू लागले तर राज्याचा विनाश ओढवेल. स्तुतीही नव्हे आणि निंदाही नव्हे. साधेपणी अहिंसात्मक तऱ्हेने सत्य सांगणे. गरज नसताना वृथा न बोलणे या सर्व बाबी सम्यक वाणीत समाविष्ट होतात.