Android app on Google Play

 

बांधकामाची शिल्पशास्त्रीय शैली

 

महाबोधी विहार विटा वापरून बांधलेले आहे आणि भारतातल्या अजूनही तग धरून असलेल्या विटांच्या सर्वात जून्या बांधकामांपैकी हे एक बांधकाम आहे. भारतीय वीटकामाचा हा एक सुरेख नमुना मानला जातो आणि नंतरच्या काळात शिल्पशास्त्राच्या परंपरेत जे काही बदल झाले किंवा प्रगती झाली, त्यावर या शैलीचा खूपच प्रभाव पडलेला दिसतो. युनेक्सोच्या म्हणण्यानुसार, "हे आताचे बौद्ध विहार म्हणजे, गुप्त साम्राज्यच्या राजवटीदरम्यान पूर्णपणे विटांचा उपयोग करून बांधलेले अगदी सुरूवातीच्या विहारांपैकी एक असलेले भव्य आणि मनोवेधक असे बांधकाम आहे."

महाबोधी विहारावर मध्यभागी असणारा मनोरा किंवा गोपुर बरेच उंच असून ही उंची ५५ मीटर (१८० फूट) आहे. १९ व्या शतकात त्याचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले. या मध्यवर्ती गोपुराभोवती त्याच शैलीत बांधलेली आणखी चार लहान गोपुरे आहेत.

महाबोधी विहाराच्या चारही बाजूंना जवळपास २ मीटर उंचीचे दगडी कुंपन आहे. या कुंपनासाठी तयार केलेल्या कठड्यांमध्येही दोन अगदी वेगवेगळे प्रकार आहेत; म्हणजे ते तयार करण्याच्या शैलीतही फरक आहे आणि त्यात वापरलेले साहित्यही दोन वेगळ्या प्रकारचे आहे. त्यातही काही करडे इ.स.पू . १५० च्या दरम्यान वाळूच्या दगडांचा वापर करून बांधलेले आहेत आणि इतर करडे पॉलिश न केलेल्या खडबडीत ग्रॅनाईटपासून बनवलेले आहेत आणि ते गुप्तकाळातील (इ.स.पू. ३ रे शतक) असावेत असे समजले जाते.

 

महाबोधी विहार

धर्मानंद कोसंबी
Chapters
महाबोधी विहार
बांधकाम
उतरती कळा
जीर्णोद्धार
बांधकामाची शिल्पशास्त्रीय शैली
बोधीवृक्ष