Android app on Google Play

 

जीर्णोद्धार

 

१८८० च्या दशकात, भारतावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सरकारने सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या मार्गर्शनाखाली महाबोधी विहाराचा जीर्णोद्धार करण्यास सुरूवात केली. यानंतर काही दिवसांनी इ.स. १८९१ मध्ये श्रीलंकेतील बौद्ध नेते अनागरिक धर्मपाल यांनी या विहाराचा ताबा हिंदूंकडून बौद्धांकडे परत द्यावा या मागणीसाठी एक मोहिम सुरू केली. हिंदू महंतांनी यावर आपेक्ष घेतवा पण मोहिम सुरूच ठेवली गेली. इ.स. १९४९ साली या मोहिमेला काही प्रमाणात यश आले; कारण तेव्हा विहाराचा ताबा हिंदू महंतांकडून काढून घेऊन बिहार सरकारकडे देण्यात आला आणि या सरकारने 'मंदिर व्यवस्थापन समिती' स्थापन केली. या समीतीत ९ सदस्य होते आणि अध्यक्षासह जास्त सभासद हिंदू होते. म्हणजेच या विहाराचा ताबा हिंदूंकडेच होता. या व्यवस्थापन समीतीने नेमलेले महाबोधीचे पहिले प्रमुख भिक्खू होते अनागरिक मुनिंद्र हे बंगाली गृहस्त, जे बऱ्याच दिवसांपासून महाबोधी मंडळाचे एक कार्यक्षम सदस्य होते.

अनागरिक धर्मपालानंतर जपानी वंशाचे भारतीय भिक्खू भदंत आर्य नागार्जून सुरई ससाई यांनी महाबोधी विहाराचा ताबा हिंदूंकडून बौद्धांकडे यावा यासाठी व्यापक आंदोलने व संघर्ष केला.