Android app on Google Play

 

बांधकाम

 

साधारणपणे, इ.स.पू. २५० मध्ये, म्हणजे बुद्धांना पूर्णज्ञान प्राप्ती नंतर २५० वर्षांनी बौद्ध सम्राट सम्राट अशोकांनी बोधगयेला भेट दिली होती. तिथे बुद्धांच्या स्मरणार्थ एक पवित्र स्थान निर्माणाचा व महा-विहार स्थापन्याचा त्यांचा मानस होता. तिथे त्यांनी विहार बांधले आणि बुद्धांना ज्या जागी ज्ञानप्राप्ती झाले होते, तीच नेमकी जागा लोकांना कळावी या हेतूने तिथे एका हिरेजडित सिंहासनाची स्थापना केली. हे सिंहासन 'वज्रासन' म्हणून ओळखले जाते.

सम्राट अशोकांना या महाबोधी विहाराचा संस्थापक समजले जाते. आता जे मंदिर उभे आहे, ते मात्र ५ व्या - ६ व्या शतकात बांधलेले असावे. गुप्त घराण्याच्या राजवटीच्या उत्तरार्धात आणि पूर्णपणे विटांनी बांधलेले हे विहार, अगदी सुरूवातीला बांधलेल्या बौद्ध धर्मीयांच्या विहारांपैकी एक आहे.