Get it on Google Play
Download on the App Store

भदन्त आनंद कौसल्यायन

डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन (जन्म - ५ जानेवारी इ.स. १९०५ निर्वाण - २२ जून इ.स. १९८८) हे एक भारतीय बौद्ध भिक्खू, लेखक व पाली भाषेचे महान विद्वान होते. यासोबतच ते आयुष्यभर हिंदी भाषेचा प्रचार करित राहिले. १० वर्ष राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धाचे प्रधानमंत्री राहिले. ते २०व्या शतकातील बौद्ध धर्माच्या सर्वश्रेष्ठ क्रियाशील व्यक्तिंमध्ये गणले जातात.

त्यांचा जन्म ५ जानेवारी इ.स. १९०५ रोजी पंजाब प्रांतातील मोहाली जवळील सोहना या गावी खेत्री कुटुंबात झाला. त्यांचे वडील लाला रामशरणदास हे शिक्षक होते. त्यांचे लहानपणीचे नाव हरिनाम होते. इ.स. १९२० मध्ये भदंत दहावीची परीक्षा पास झाले. भदंत इ.स. १९२४ मध्ये १९ व्या वर्षी पदवी पास झाले. ते लाहौर मध्ये असतांना उर्दू भाषेत देखील लिहित असत.