बांधणी
हिमाकुश पर्वतरांगेमध्ये बनविलेल्या ह्या मूर्त्या कच्ची लाल रेती, चिखल, दगडगोटे, क्वार्ट्झ, वालुकामय खडक आणि चुनखडी वापरून बनविले गेले आहेत. बांधकामानंतर सतत बदलत असलेल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणामुळे यांची निगा राखली गेली नाही. या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असले तरी बर्फ वितळताना मूर्त्या नष्ट होऊ लागल्या होत्या. हा प्रदेश भूकंपप्रवण आहे आणि आजतगायत अनेकदा भूकंप होऊन मूर्त्यांच्या आसपासचे अनेक मोठे खंड ढासळलेले दिसतात.