नशीब आपणच घडवितो
<p dir="ltr">एक ब्राम्हण असतो त्यांचं लग्न होऊन दोन वर्षे झाली तरी मुलबाळ नव्हते तर ते पुष्कळ प्रयत्न करीत असतात पण काही फरक पडत नाही ते एकदा तिर्थयात्रे साठी चारधाम जातात तिथे त्यांना एक मुनी महाराज भेटतात ते त्यांना एक फळ देतात हे फळ बहुगुणी आहे ते पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून स्नान संध्या उरकून नंतर ५ते६वाजेपर्यत ब्रम्हा यांच्या फोटो समोर ठेवून १०८वेळा ब्रम्हा जप करावा तुळशीची पाने फोटोवर वाहावी आणि हे फळ अर्धे अर्धे दोघांनी मिळून खायचं नंतर सहा महिन्यांत तुम्हाला एक सुंदर आणि गोडस मुलगा होईल  असं सांगून ते मुनी महाराज निघून जातात ब्राम्हण तिर्थयात्रा वरुन घरी परतल्यावर श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला पहाटे उठून स्नान संध्या उरकून घेतले ब्रम्हदेवाचा ‌भला मोठा फोटो तयार करून आणलेला असतो तो समोर ठेवून त्यावर फुलांचा हार घालून सुगंधीत अगबत्ती लावतात नंतर १०८वेळा ब्रम्हादेवाचा जप करुन फोटोवर तुळशीचे पानं वाहतात हे सर्व करुन झाल्यावर दुपारी पाच सुवासिनी आणि पाच ब्राम्हणाना मिष्ठान्न खायाला घालून त्यांना कापड नारळ अपर्ण करीतात बरोबर सहा महिन्यांत ब्राम्हणाची पत्नीला दिवस जातात ही शुभ वार्ता पत्नी आपल्या पतीराजाला सांगते हे ऐकून ब्राम्हण खुश होतो सर्व ब्राम्हण वाडीत तो ब्राम्हण पेठे वाटतो पुढे नव महिन्यात त्यांना एक सुंदर आणि गोडस मुलगा होतो.              ‌<br>
                    क्रमशः</p>
                    क्रमशः</p>