Get it on Google Play
Download on the App Store

नरहरी लंपट निशिदिन

सूर्य असे गगनीं । परी दिसतो जीवनीं ॥ १ ॥

मेघ असतो अंबरीं । पाणी पडे भूमीवरी ॥ २ ॥

आकाशीं चंद्र तारांगण । बिंब दिसे पाण्यांतून ॥ ३ ॥

बिंब पाहतां दर्पणीं । बिंबे दिसे त्यांतुनी ॥ ४ ॥

आत्मा अनुभवीं पाहतां । देव दिसे हो तत्वतां ॥ ५ ॥

गुरु कृपा होय पूर्ण । नरहरी लंपट निशिदिन ॥ ६ ॥