Android app on Google Play

 

भयानक रात्र भाग 3

 

तेवढ्यात तिथे ती वृद्ध म्हथारी आली तिने दरवाजा कसा उघडला कुणास ठाऊक ती येऊन पुन्हा तेच वाक्य बोलून गेली तिला आम्ही विचारले देखील की तुम्ही कश्या बद्दल बोलत आहेत त्यांनी दुर्लक्ष केले व तिकडून निघून गेल्या अचानक कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज येऊ लागला पुढे एक सावली दिसली पण भुताची तर सावली दिसत नसते अस ऐकण्यात होत मग कळलं की तेथे एक माणूस होता जो की त्या हवेलीत पहारा देतो तो समोरून धावत बाहेर गेला तो घामागघुम होता व फार घाबरलेला त्या हवेली मधून एक आवाज आला तुम्ही कोण इकडे का आलाय परत जाआम्ही तसेच मागे फिरलो आणि घरी जायचा निर्णय घेतला आम्ही परत वळलो पण आमच्या मैत्रिणी पैकी एक जनिनी माघे वळून पाहिलं तर लाल साडी , लाल बांगड्या , चेहरा फार भयानक , काली टिकली , व लाल लाली तिचा तो लग्नचा मेकअप होता असे वाटले माझी मैत्रीण फार घाबरली.

ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली ती लाल साडीतली बाई फक्त एकच बोलली मागे वळून पाहण्यास सक्त मनाई आहे असा तुम्हाला बज्यावण्यात आलं होतं आता तुम्ही इकडून परत नाही जाऊ शकत आम्हाला नंतर कळलं की ती भूत आहे तिचे पाय उलटे आणि तिच्याकडे एक भाऊली पण होती ती पण एकाच वाक्य बोलायची मागे बघण्यास सक्त मनाई आहे आम्ही बाहेर जाण्यासाठी एक उपाय काढला मारुती मंत्र अस ऐकण्यात होत की त्याने भूत घाबरतात आम्ही तो जोरजोरात बोलू लागलो त्याने ती घाबरली आम्ही तिथून कसेंबसे बाहेर आलो बाहेर आल्यावर आम्ही तेथून येताना एका झाडाखालि एक म्हातारा दिसला त्याने आम्हाला थांबवलं आणि तिकडची सर्व हकीकत सांगितली

To be continued ........